NGN News
Latest Marathi News

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनचा पदग्रहण सोहळा दिमाखात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनच्या लायन वर्ष २०२६–२७ च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, नवीन सभासदांचा शपथविधी तसेच ‘नाशिक स्मार्ट सिटीजन पुरस्कार–२०२६’ वितरण समारंभ हॉटेल रेडिसन ब्ल्यू, नाशिक येथे अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर माजी पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला.

उपप्रांतपाल-२ एमजेएफ लायन सुनिता मालपाणी यांनी नूतन अध्यक्ष लायन सचिन वाघमारे, सचिव लायन रविंद्र सोनजे, खजिनदार लायन संजय दुसे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. नवीन सभासदांना माजी अध्यक्ष लायन राजेंद्र कोठावदे यांनी लायन्सची शपथ देऊन क्लबमध्ये स्वागत केले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते एमजेएफ लायन गिरीश मालपाणी यांनी लायन्सच्या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजसेवा, नेतृत्व, संघभावना आणि मानवतेची सेवा या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

समारंभात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘नाशिक स्मार्ट सिटीजन पुरस्कार–२०२६’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. धनंजय देशमुख, डॉ. सुनिता मोडक, सौ. नयना विजय पगारिया आणि श्री अमित श्रीश्रीमाळ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी विविध समाजोपयोगी सेवा उपक्रमही राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एमजेएफ लायन विनोद कपूर, क्लबचे संस्थापक अध्यक्ष व सह्याद्री लायनचे संपादक लायन जयंत येवला, रिजन चेअरपर्सन लायन हंसराज देशमुख, झोन चेअरपर्सन लायन सुजाता लोहारकर, इन्स्टॉलेशन चेअरपर्सन लायन विनोद सोनजे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

याशिवाय लायन भूषण कोठावदे, लायन महेश पितृभक्त, लायन किशोर शिरोडे, लायन अभिजीत पाचपुते, लायन हर्षद चिंचोरे, लायन विलास लिदुरे, लायन मोहन काळे, लायन रामचंद्र जोशी, डॉक्टर किशोर पाटील, लायन डॉक्टर जगदीश धामणे लायन रवींद्र झोपे, लायन योगेश नेरकर, लायन प्रवीण अमृतकर, लायन पवन राठी यांच्यासह मोठ्या संख्येने लायन सदस्य, मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडले. पुरस्कार वितरण, नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि समाजसेवेचा संदेश यामुळे हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असा प्रेरणादायी ठरला.

Comments are closed.