
- जगदगुरु शांतीगिरीजी महाराज यांची लाभली उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
ओझर : अमर आढाव
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ अंतर्गत श्री क्षेत्र राम समर्थ मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हास्तरीय संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमास निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी गोमाता आणि पशुधनाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व विशद केले, तसेच सेंद्रिय व शाश्वत शेतीमध्ये गोवंशाची भूमिका किती मोलाची आहे यावर सखोल प्रकाश टाकला.
या संवाद सोहळ्याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाच राज्यांचे क्षेत्रप्रमुख सुधीर विध्वंस, विश्व हिंदू परिषद गोरक्षाचे देवगिरी प्रांत प्रमुख राजेश जैन यांची उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय अधिकारी व संयोजकांमध्ये जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. नानासाहेब कदम, पशुसंवर्धन नोडल अधिकारी डॉ. रमण इंगळे, संवाद यात्रा कार्यक्रम संयोजक सुहास न्यायाधीश आणि कार्यक्रमाचे नियोजन करणारे मनिष वर्मा उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात गोशाळा प्रतिनिधी श्रीपाद सावरगावकर, गोशाळा महासंघ प्रतिनिधी आकाश मेटे यांच्यासह महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सुर्यवंशी, उद्धव नेरकर, संजय भोसले, सनतकुमार गुप्ता, दिपक भगत आणि परेशभाई शहा यांनीही सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगर व परिसरातील पशुपालक बांधव, विविध गोशाळांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि गोप्रेमी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी गोवंश रक्षणाचा दृढ संकल्प केला आणि हा संवाद सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
Comments are closed.