
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जागतिक योग दिनानिमित्ताने आज महाराष्ट्र व देशभरातील सुमारे 1800 श्री स्वामी समर्थ केंद्रावर प पू अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वादाने योग शिबीर संपन्न होऊन त्यात सुमारे 2 लाख आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला.नाशिक जिल्ह्यात 150 तर शहरात 50 केंद्रावर अनुक्रमे 11हजार व 5 हजार जणांनी योग साधला.
त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठात योग दिनाचे महत्व विषद करताना चंद्रकांतदादा मोरे म्हणाले, “योगाने लवचिकता आणि ताकद वाढते.मणक्याची, स्नायूंची लवचिकता वाढते. सुरुवातीला स्पर्श न होणारे पायाचे अंगठे 2-3 आठवड्यात सहज जुळतात.- वीरभद्रासन, फलकासन यामुळे हात, पाय, कोर मसल्स मजबूत होतात.बैठ्या कामामुळे होणारी पाठदुखी आणि मानदुखी भुजंगासन, मार्जरीआसनाने कमी होते.नियमित सरावाने पोश्चर सुधारतो.प्राणायाम आणि अनुलोम-विलोममुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.रक्तदाब आणि हृदयाची गती स्थिर राहायला मदत होते.- पवनमुक्तासन, वज्रासन जेवणानंतर केल्याने गॅस, अपचन कमी होतं.मेटाबॉलिझम वाढल्याने वजन नियंत्रणात राहायला मदत होते.शवासन आणि भ्रामरी प्राणायाम केल्यावर झोप लवकर लागते आणि गाढ लागते.योगाने ताण आणि चिंता कमी होते.
योगादरम्यान श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन भटकत नाही. कॉर्टिसॉल म्हणजेच ताणाचा हार्मोन कमी होतो.10 मिनिटं अनुलोम-विलोम केलं तरी डोकं शांत होतं.एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते,ध्यान आणि त्राटकामुळे मन एका ठिकाणी टिकवायची सवय लागते. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी योग फायदेशीर आहे.योगामुळे सेरोटोनिन आणि डोपामिन वाढतात. त्यामुळे चिडचिड, नैराश्य कमी होतं.आत्मजाणीव वाढते,शरीर मनाशी जोडलं जातं. राग, भीती, आनंद या भावना समजून घ्यायला मदत होते.एकंदरीत भारतीय पूर्वाचाऱ्यांनी, ऋषी, मुनींनी भारतास नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या शारीरिक, आत्मिक उन्नतीसाठी ही मोठी देणगी दिली आहे.”
Comments are closed.