
- आशुतोष डागा यांचे सीए परीक्षेत यश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव येथील द्वारका मेडिकल स्टोअर्सचे संचालक नटवरलाल डागा यांचे चिरंजीव आशुतोष नटवरलाल डागा यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
आशुतोष हे नाशिक येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल एस. एम. डागा यांचे पुतणे आहेत. तसेच के. डी. डागा यांच्या कुटुंबातील सीए होणारे ते सातवे सदस्य ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे डागा कुटुंबाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे.
आशुतोष यांच्या या यशाबद्दल व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments are closed.