
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाखारवाडी गावचे सुपुत्र संजय कारभारी निकम यांना महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागात मुंबई येथे अप्पर राज्यकर आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सध्या ते राज्यकर सह आयुक्त म्हणून कार्यरत होते.
देवळा तालुक्यातील वाखारवाडी सारख्या एका छोट्या गावातून जाऊन त्यांनी यश प्राप्त केल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. ते शासकीय विद्यानिकेतन नाशिक व धुळे तसेच फर्ग्युसन महाविद्यालय पुणे आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या प्रतिष्ठित संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्यातील पदवी सुद्धा घेतली आहे.
निकम यांची आत्तापर्यंतची राज्य वस्तू व सेवा कर विभागातील कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय असून एक कर्तव्यतत्पर,प्रामाणिक,प्रयोगशील,आणि हुशार अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. विभागाची गुणवत्ता वाढ करण्यासाठी त्यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये संबंधित विभागाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागात अनेक सुधारणा घडवून आणल्या. शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांमध्येही त्यांनी यशस्वीपणे काम केले.
विभागातील उत्तम काम आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच ग्रंथालयनिर्मिती अशा समाजोपयोगी कामांची दखल घेऊन अनेक संस्थांनी व शासनाने त्यांचा गौरव केला आहे. ही आनंदवार्ता समजताच शासकीय विद्यानिकेतनच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments are closed.