
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गणेश कापडणीस यांचा साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हृद्य सन्मान करण्यात आला. कापडणीस हे वीजनिर्मिती कंपनीचे कर्मचारी आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी कापडणीस यांना सन्मानित केले.
विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार विजेत्यांमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, महिंद्र आणि महिंद्र ( इगतपुरी ) कंपनीचे कर्मचारी रोहिदास चौधरी आणि राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बापू वाघ यांचाही समावेश आहे. डॉ. धर्माधिकारी यांनी कापडणीस यांचे अभिनानादन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी, हॉस्पिटलच्या मार्केटिंग विभागाचे रिझवान इनामदार हे उपस्थित होते. दरम्यान, पुरस्कार वितरण लवकरच मुंबई येथील सोहळ्यात होणार असल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त भास्कर मोराडे यांनी दिली.
Comments are closed.