
- आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक ग्रामीण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व खासदार पार्थ पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ, पक्षाचे नेते खासदार पार्थ पवार, आमदार पंकज भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ यांची देखील भेट घेत त्यांचा सन्मान केला.
पक्ष संघटनेतील त्यांचे दीर्घकालीन योगदान, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची दिलीप खैरे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर दिलीप खैरे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा व विकासाचा अजेंडा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही दिलीप खैरे यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत संघटनात्मक बळकटीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात पक्षाची ताकद वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन विस्तार करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी नाशिक, येवला तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व भुजबळ समर्थक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिलीप खैरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक कार्याला नवीन दिशा व गती मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, डॉ.योगेश गोसावी, संतोष डोमे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, दत्ता निकम, शंकर मांजरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, योगेश आहेर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर,भाऊसाहेब धनवटे, पूजा आहेर, पुष्पा राठोड, सुरेखा दराडे, मकरंद सोनवणे, कांतिलाल साळवे, भगवान ठोंबरे, नितीन गायकवाड, दिपक गायकवाड, आकाश पगार, जावेद लखपती, भालचंद्र भुजबळ, सोहेल मोमिन, प्रसाद सोनवणे, राजेंद्र जगझाप, शशी बागुल, शंकर मोकळ, रघुनाथ आहेर, भरत खैरनार, राजेंद्र सोनवणे, अमजद शेख, बबलू शेख, सचिन गिते, राहुल घोडे, संदीप गांगुर्डे, संतोष भुजबळ, अँड प्रतीक कर्डक, यश जेजुरकर, शिवा काळे, कुलदीप जेजुरकर, भगीरथ माळी, महेंद्र जाधव, नाना सोमवंशी, सचिन सोनवणे, महेश गादेकर, शफिक शेख, बलू शेख, अमजद शेख मुजफ्फर शेख, नाना सोमवंशी, नंदाराम शेळके, योगेश भावरे, महेंद्र जाधव, सुरेश गायकवाड, सचिन मराठे, संदीप गांगुर्डे, रोहित जाधव, समाधान पगारे, गणेश गवळी, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.