नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्तीन पिंटो सर, संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे जागतिक पर्यावरण दिन दिनांक5 जून या दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे इयत्ता नववीचे 20 विद्यार्थी विहित गाव येथे गेले होते व तेथे त्यांनी नदीकिनारी वेगवेगळ्या वृक्षांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण केले या कार्यक्रमाला त्या भागातील नगरसेवक योगेश गाडेकर व केशव पोरजे उपस्थित होते. नगरसेवकांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पर्यावरण सजगते चे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना प्रमोद गीते सरांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या परिसरातही विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूपाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे व इतर शिक्षक वृंदांनी प्रयत्न केले
Comments are closed.