NGN News
Latest Marathi News

‘एसएमबीटी’त अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाने मूत्रविकार शस्रक्रिया उपचार

  • मुतखडा आणि प्रोस्टेट ग्रंथींची अद्ययावत शस्रक्रिया
  • 60W थुलियम लेझर जे उत्तर महाराष्ट्रात ‘लेझर प्रोस्टेट’ शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहे
  • अद्ययावत लेझर तंत्रज्ञान: विना चिरा, विना वेदनाविरहित मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथींचे अचूक ऑपरेशन.
  • किडनी ट्रान्सप्लांट सेंटर: उच्च दर्जाची टीम आणि दर्जेदार सक्सेस रेट.
  • क्लिष्ट शस्त्रक्रियांचे केंद्र: कॅन्सर (युरोलॉजिकल मॅलिग्नन्सी) आणि इतर जन्मजात मूत्रविकारांवर यशस्वी उपचार.
  • ३७० पेक्षा अधिक तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची मोठी टीम
  • शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांच्या देखभालीसाठी २४ तास प्रशिक्षित आणि अनुभवी सपोर्टिंग स्टाफ

नंदी हिल्स | एनजीएन न्यूज नेटवर्क

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यांच्या बळावर नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने उत्तर महाराष्ट्रात सुपर स्पेशालिटी उपचारांचे एक नवे पर्व सुरू केले आहे. हॉस्पिटलचा मूत्ररोग (Urology) विभाग हलाखीच्या अवस्थेत आलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. याठिकाणी अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जात असून या सर्व शस्रक्रिया या शासकीय योजनेअंतर्गत मोफत होत असल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार तेही मोफत आणि परवडतील अशा दरात करून घेणे शक्य झाले असल्याची माहिती मूत्ररोग विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉ. नरसिंग माने यांनी दिली.

ते म्हणाले, मूत्ररोग विभागात नुकतेच अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक लेझर मशीन दाखल झाले आहे. 60W थुलियम लेझर जे उत्तर महाराष्ट्रात ‘लेझर प्रोस्टेट’ शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहे. यासोबतच १०० टक्के मुतखड्याचे (Kidney Stone) ऑपरेशन करण्यासाठीदेखील हे लेझर महत्वाचे आहे. यामुळे शरीरावर कोणताही काप किंवा चिरा देण्याची गरज नाही. संपूर्णपणे दुर्बिणीद्वारे आणि लेझरच्या साहाय्याने खड्यांचे बारीक कण करून ते शरीराबाहेर काढणे शक्य झाले आहे. यामुळे रुग्णाला कोणतीही अंतर्गत किंवा बाह्य दुखापत होत नाही, रक्तस्त्राव होत नाही. शिवाय वेदनाही जाणवत नाहीत. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुग्ण अवघ्या दुसऱ्या दिवशी बरा होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवू शकतो. या लेझर तंत्रज्ञानाचा लाभ नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, ठाणे, पालघर, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड, धाराशिव परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय टळली आहे.

डॉ. माने पुढे म्हणाले की, किडनी, मूत्रवाहिनी आणि मूत्रशयातील मुतखडा (Kidney, Ureter & Bladder Stones), प्रोस्टेट ग्रंथी वाढणे (BPH), दोन्ही किडन्या निकामी होणे (Kidney Failure), किडनी प्रत्यारोपण (Kidney Transplant), डायलिसीस, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी प्रशस्त स्वतंत्र वार्ड, किडनी, प्रोस्टेट व मूत्रशयाचा कॅन्सर (Urological Cancers), मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग (UTI), लघवीतून रक्त येणे, महिलांमध्ये खोकताना किंवा शिंकताना नकळत लघवी गळणे (Urinary Incontinence), पुरुषांमधील वंध्यत्व आणि लैंगिक समस्या (Andrology & Male Infertility), लहान मुलांमधील जन्मजात मूत्रविकार (Pediatric Urology), किडनीला सूज येणे (Hydronephrosis) आणि मूत्रमार्गाची अरुंदता (Urethral Stricture). किडनी निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये राबवला जाणारा ‘किडनी ट्रान्सप्लांट’ (मूत्रपिंड प्रत्यारोपण) उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत असल्याचे सांगत डॉ. माने यांच्यासह टीमने वर्षभरात १७ हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी केले आहेत. किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांचा ‘सक्सेस रेट’ अतिशय उत्तम आहे. चोख पूर्वतयारी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रियेनंतरची विशेष देखभाल यामुळे अनेक रुग्णांना याठिकाणी पुनर्जन्म मिळाला आहे.

लेझर सर्जरीचे फायदे

  • शरीरावर कोणताही टाका किंवा डाग पडत नाही.
  • इन्फेक्शन (संसर्ग) होण्याचा धोका अत्यंत कमी.
  • हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहावे लागत नाही
  • पैशांची आणि वेळेची बचत.
  • अत्यंत सुरक्षित आणि अचूक उपचार पद्धती.

रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेवर भर
आमचा उद्देश रुग्णांना कमीत कमी वेदना आणि जास्तीत जास्त अचूकतेसह उपचार देणे हा आहे. नवीन लेझर मशीनमुळे अत्यंत कठीण जागी असलेले खडे देखील आम्ही सहज काढू शकत आहोत. किडनी ट्रान्सप्लांटपासून ते युरो-कॅन्सरपर्यंतच्या सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता एसएमबीटीमध्ये पूर्ण विश्वासाने केल्या जातात. रुग्णकेंद्रित दृष्टीकोन समोर ठेऊन रुग्णसेवा केली जात आहे.
डॉ. नरसिंग माने
विभागप्रमुख व मूत्ररोग तज्ज्ञ,
एसएमबीटी हॉस्पिटल

शासकीय योजनेतून मोफत उपचार
एसएमबीटी व्यवस्थापनाने नेहमीच रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. याठिकाणी होणाऱ्या बहुतांश हृदयशस्रक्रिया ‘आयुष्मान भारत’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात. आर्थिक परिस्थितीअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत, ही व्यवस्थापनाची भूमिका असून, योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रियांसाठी ऑपरेशन चार्जेस, डॉक्टर चार्जेस, भूलतज्ञ चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण सर्व मोफत करण्यात आले असून केवळ औषधांच्या खर्चात हजारो रुग्णांवर आजवर उपचार करण्यात आले आहेत.
-सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

Comments are closed.