
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात २.६१ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात २.१७ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला आणखी भुर्दंड पडणार आहे.
पहिली दरवाढ १५ मे रोजी सुमारे ३ रुपयांनी झाली. त्यानंतर १९ मे रोजी सुमारे ९० पैशांनी, पुन्हा २३ मे रोजी सुमारे ९० पैशांनी आणि आता २५ मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या १० दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹७ .३५ ने आणि डिझेल प्रति लिटर ₹७.५३ ने महाग झाले आहे.
नाशिकमधील नवे दर असे :
पेट्रोल : रु. ११२.४७
डिझेल : रु. ९९.११
Comments are closed.