
- सलग नवव्या वर्षी आयोजन; जगदीश गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा फाऊंडेशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आय. एस. पी. व सी. एन. पी नोटप्रेस अंतर्गत स्वर्गीय कामगार नेते पी. डी. गांगुर्डे नाना यांच्या स्मरणार्थ गेल्या नऊ वर्षांपासून कामगार व कामदार यांच्यात सामाजिकदृष्ट्या एकात्मता व कामगार ऐक्य सलोखा टिकवावा या दृष्टिकोनातून भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
नाशिकरोड यू. एस. जिमखाना येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या क्रिकेट टुनमिंटचे उद्घाटन प्रेसचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्नरे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, श्री समर्थ बँकेचे व्हाईस संचालक राजेश गांगुर्डे, प्रवीण बनसोडे, नितीन तेजाळे, तसेच पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा बहुउद्देशीय संस्थेचे दत्ता गांगुर्डे, राहुल रामराजे, संदीप गांगुर्डे, दिपक कटारे, सुशील बर्वे, राजेश शेळके, प्रकाश सोनवणे, सुधीर गायकवाड, गणेश कळमकर हे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.