
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वर्गीय विधिज्ञ मधुकर तोष्णीवाल स्मृत्यर्थ आणि साई लॉ अकादमीच्या रौप्य महोत्सवानिमित्त सुप्रसिध्द कायदा अभ्यासक सुचित्रा देशपांडे आणि निलेश देशपांडे लिखित दहा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला.
गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित या सोहळ्याला पुणे येथील ख्यातनाम विधिज्ञ सुधाकर आव्हाड, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, भास्करराव पवार, नंदकिशोर भुतडा, जयंत जायभावे, श्री रायते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवर अतिथींनी देशपांडे दाम्पत्याच्या अभ्यासू वृत्ती, कायदे विश्वाबाबतची जागृती आणि चिकाटी यांबाबत कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविकात निलेश देशपांडे यांनी एकाच वेळी दहा पुस्तकांच्या प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट करून या कार्यात लाभलेल्या अनेकांच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहकार्याप्रती ऋण भाव प्रकट केला. विधिज्ञ जालीन्दर ताडगे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी विधी आणि सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुस्तकांचे झाले प्रकाशन…
1.Family law 1
2.Contract 1
3.Constitution 1
4.Intellectual Property Law
5.Criminal Psychology
6.Media Law
7.Jurisprudence
8.Interpretation Of Statutes
9.Bhartiya Sakshya Adhinyam,2023
10.Professional ethics

Comments are closed.