- नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका
** एनजीएन न्यूज नेटवर्क
इगतपुरी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केल्याने तसेच निवडणुकीनंतरही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने कार्यकर्ते किरण फलटणकर यांची पक्षातून पुढील सहा वर्षां करिता हकालपट्टी करण्यात आली आहे. सदर निलंबनाचे पत्र हे जिल्हा भाजपा कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले असून त्यावर भाजपा नासिक जिल्हा ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांची स्वाक्षरी आहे.
पक्षाच्या निवडणूक नियमावली नुसार इगतपुरी नगरपालिका निवडणुकीतील हे तिसरे निलंबन आहे. अगोदरच दोन भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात उमेदवारी केल्याने निवडणुकीच्या वेळी दोघांना निलंबित करण्यात आले होते. त्या नंतर झालेले हे तिसरे निलंबन आहे.
अशाच प्रकारे नाशिक महानगरपालिका निवडणुकीत 30 कार्यकर्त्यांचे निलंबन करण्यात आले होते. याबाबतीत भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे. भाजपात पक्षाची शिस्त मोडलेली चालत नाही, फक्त एवढेच सांगत जास्त प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
Comments are closed.