- भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ‘मविआ’ चे प्रत्येकी एक उमेदवार वरिष्ठ सभागृहात
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी ट्विस्ट आला आहे. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला असून रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील सात जागांसाठी अखेर सात अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे उमेदवार-
- रामदास आठवले
- विनोद तावडे
- माया चिंतामण ईवनाते
- रामराव वडकुते
शिवसेना शिंदे गट-
- ज्योती वाघमारे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-
- पार्थ पवार
महाविकास आघाडी
- शरद पवार
Comments are closed.