NGN News
Latest Marathi News

३८०० किमी ची मोहिम सायकलस्वारांकडून ११ दिवस १० तासांत पूर्ण

  • नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे ५ पुरुष व ४ महिला सदस्य सहभागी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मजबूत भारत बनवायचा असेल तर समस्त भारतीयांना राष्ट्रभक्ती, त्याग आणि अनुशासन या त्रिसुत्री संकल्पनेचे अनुकरण करणे अपरिहार्य आहे, हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य काश्मीर ते कन्याकुमारी या ३८०० कि मी सायकल राईडने मार्गस्थ झाले.

गेल्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी लाल चौक श्रीनगर, जम्मू काश्मीर येथून राईडला सुरुवात केली. पुढे ही मोहीम पंजाब राज्यातील पठाणकोट, जालंधर, लुधियाना, हरीयाणा मधील अंबाला, पानिपत , सोनीपत मार्ग २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दिल्ली येथे पोहोचली. २१ फेब्रुवारी रोजी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शुभेच्छा देऊन सायकल मिशनला फ्लॅग ऑफ केले, सकाळी ७:०० वा. इंडिया गेट दिल्ली येथुन पुढील राईड साठी मार्गस्थ झाली. उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा, मध्यप्रदेश मधील ग्यालीयर, सागर मार्ग दिनांक २३ तारखेला महाराष्ट्रतील नागपूर येथे नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी विशेष स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
दिनांक २४ तारखेला सकाळी 07 वा भारताचा मध्य बिंदू,झिरो पॉईंट येथुन मार्गस्त झाली येथे नागपूर सायकलीस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले पुढील सायकल राईड तेलंगणा मधील कामारेड्डी, आंध्रप्रदेश मधील हैद्राबाद , कूर्नुल , कर्नाटक मधील बंगळुरू, सेलम अनंतपुरम, तामिळनाडू मध्ये दिडींगुल,मदुराई, मार्ग कन्याकुमारी येथे दिनांक २८ ता. संध्याकाळी ०५:३० वा कन्याकुमारी येथील झिरो पॉईंट जिथे एन एच ४४ संंपतो तेथे Strong India मजबूत भारत या सायकल मोहीम ची सांगता झाली.

सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष अमित घुगे, उपाध्यक्ष दविंदर भेला, चंद्रकांत नाईक, रविंद्र दुसाने, विजय गडाख, माधुरी गडाख, अश्र्विनी कोंडेकर, साधना दुसाने व सिमा घुगे यांनी न संपूर्ण ताकदीने, प्रयत्नांची पराकाष्ठा करत ३८०० कि. मी ची मोहीम ११ दिवस १० तास, ९ मिनिटात पूर्ण केली. यात 3 दाम्पत्यांनी पहिल्यांदाच हा really पद्धतीने सायकलिंगचा विक्रम नोंदविला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माधुरी गडाख, साधनां दुसाने, अश्विनी कोंडेकर, सीमा घुगे या महिलानी विक्रम केला.

Comments are closed.