- गुंतवणूकदारांना मालमत्ता प्रकार, अनेक तज्ज्ञ व्यवस्थापक आणि विविध क्षेत्रनिहाय रणनीती सादर करणे फंडाचे उद्दिष्ट
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
डीएसपी म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी आज डीएसपी मल्टी अॅसेट ओम्नी फंड ऑफ फंड्स हा नवीन फंड आणला आहे. ही नवीन योजना मुदतमुक्त श्रेणीतील फंड ऑफ फंड प्रकारची योजना आहे. शेअरबाजारातील घडामोडींचा सतत मागोवा घेणे, कोणत्या प्रकारात कधी आणि किती निधी गुंतवायचा अथवा शेअरबाजाराच्या वेगवेगळ्या चढउतारांदरम्यान विविध पर्यायातील गुंतवणूकीच्या व्यवस्थापनाबाबत स्वतःहून निर्णय घेणे शक्य नसणाऱ्या व्यक्तींसाठी गुंतवणूक सुलभ करणे, हा या फंडाचा उद्देश आहे. नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) ५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणूकीसाठी खुली होणार असून येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होणार आहे.
डीएसपी म्युच्यूअल फंडने स्वतः विकसित केलेली बाजाराची माहिती देणारी प्रणाली (मार्केट इंटेलिजन्स फ्रेमवर्क) डीएसपी नेत्रव्दारेहा फंड संचलित केला जाणार आहे. डीएसपी नेत्र प्रामुख्याने बाजारातील आकडेवारी, मूल्यांकन आणि दीर्घकालीन ऐतिहासिक कल आदी घटकांचा विश्लेषणासाठी वापर करते. याद्वारे विविध गुंतवणूक प्रकारांमधील जोखीम आणि नफ्याची शक्यता (मार्जिन ऑफ सेफ्टी) यांचा अंदाज घेतला जातो आणि त्यामुळे शेअरबाजाराच्या बदलत्या परिस्थितीनुसार गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास मदत होते.
बाजाराचे नेतृत्व करणाऱ्या क्षेत्रांमध्ये वारंवार होणारे बदल,व्याजदरांचे चक्र आणि जागतिक अनिश्चिततेच्या सध्याच्या वातावरणात, हा फंड गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी सुनियोजित मार्ग उपलब्ध करून देतो. यामुळे गुंतवणूकदार भविष्यातील कोणत्याही अंदाजावर विसंबून न राहता किंवा शेअरबाजारातील घडामोडींमुळे विचलित होऊन घाईघाईने निर्णय न घेता आपली गुंतवणूक विविध प्रकारात विभागून गुंतवणूकीत स्थिरता राखू शकतो.डीएसपी मल्टी अॅसेट ओम्नी फंड ऑफ फंड्स आपला निधी बाजारातून मिळणाऱ्या संकेताच्या आधारे समभाग-आधारित योजना, कर्जरोखे-आधारित योजना आणि सोने आणि चांदी ईटीएफसारख्या कमोडिटी-आधारित योजनांमध्ये अतिशय गतिमान पध्दतीने गुंतवतो. केवळ परताव्याच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून न राहता, विविध गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक विभागात हा फंड वाढीची क्षमता आणि जोखीम व्यवस्थापन यांच्यात संतुलन राखण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
फंडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात विविध म्युच्युअल फंड कंपन्याचे फंड (एएमसी) आणि ईटीएफ यामध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता आहे. यामुळे बदलणाऱ्या काळानुरूप त्याचबरोबर बाजारातील बदलत्या संधीनुरूप या फंडाचा पोर्टफोलिओ स्वतःला जुळवून घेऊ शकतो. यासाठी हा फंड उद्योगातील सर्वोत्कृष्ट इक्विटी फंड व्यवस्थापकांच्या समभाग निवडीच्या कौशल्याचा आणि विविध प्रकारांत निधी गुंतवणूकीसाठी डीएसपी नेत्रने विकसित केलेल्या धोरणांचा एकत्रित वापर करतो. गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमधील पुनर्संतुलन हे फंडाच्या अंतर्गतच केले जाते. परिणामी गुंतवणूकदाराने स्वतः वारंवार खरेदी-विक्रीचे निर्णय घेतल्यास कराचा त्याच्यावर पडणारा बोजा या फंडातील गुंतवणूकीमुळे कमी करण्यास मदत होते.
स्वतःहून गुंतवणुकीसाठी निधीचे वाटप करणे किंवा बाजारातील अल्पकालीन हालचालींवर लक्ष ठेवून निर्णय घेणे ज्यांना आवडत नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी व्यावसायिकरीत्या व्यवस्थापित केलेला गुंतवणूक पर्याय म्हणून ही फंड योजना साकारण्यात आलेली आहे. बाजारात तीव्र अस्थिरता असताना हा फंड समभागांमधील आपली गुंतवणूक २५ टक्क्यांवर आणू शकत असल्यामुळे मोठ्या घसरणीपासून सुरक्षिततेचा एक अतिरिक्त स्तर गुंतवणूकदारांना प्राप्त होतो.
हा फंड साधारणपणे २५ टक्के ते ७५ टक्के निधी समभाग योजनांमध्ये, १५ टक्के ते ५० टक्के कर्जरोख्यांमध्ये आणि १० टक्के ते ५० टक्के सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करेल. बाजाराच्या तत्कालीन परिस्थितीनुसार या गुंतवणुकीचे प्रमाण कमी-जास्त केले जाईल. या गुंतवणूक पद्धतीचा उद्देश अर्थव्यवस्थेच्या आणि शेअरबाजाराच्या विविध चक्रांमध्ये अधिक सक्षम आणि लवचिक पोर्टफोलिओ तयार करणे हा आहे.
Comments are closed.