NGN News
Latest Marathi News

ईएलएसएसला डीएसपी म्युच्युअल फंडाकडून नवी प्रतिमा प्रदान

  • करबचतीचे नव्हे तर शिस्तबध्द गुंतवणूक पर्यायाचे रुप

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय गुंतवणूकदारांना पूर्वीच्या तुलनेत समभागांशी संबंधिक अनेक गुंतवणूक पर्याय आता सहज उपलब्ध असले तरी शेअरबाजाराच्या चढउतारात सतत गुंतवणूक करत राहणे, ही कायम आव्हानत्मक बाब असते. डीएसपी म्युच्युअल फंडाने दीर्घकालीन गुंतवणूकीबाबत एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ईएलएसएस) या फंड योजना प्रामुख्याने कर-बचतीचे पर्याय म्हणून नव्हे तर दीर्घकालीन गुंतवणुकीत वर्तनाचा पडणारा प्रभाव दूर करण्यास सहाय्य करणारा पर्याय आहे, हा नवा दृष्टीकोन ईएलएसएसबाबत गुंतवणूकदारांसमोर आणला आहे.

गुंतवणूकदारांच्या वाढत्या वर्गासाठी कलम 80 सीअंतर्गतच्या करबचतीला आता फारसे महत्व राहिलेले नाही. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षांत गुंतवणूकदारांमध्ये ईएलएसएसबाबतची लोकप्रियता कमी होत चालली आहे. तथापि, डीएसपी म्युच्युअल फंडाचा असा विश्वास आहे की, विविध कारणास्तव करबचत करणे आवश्यक असले तरी ईएलएसएसची रचनात्मक वैशिष्ट्ये, विशेषतः तीन वर्षांसाठी गुंतवणूक कायम ठेवण्याची सक्तीचे महत्व आजच्या काळातही टिकून आहे.

“गुंतवणूकदारांच्या निर्णयावर गुंतवणूक पर्याय निवडीचा प्रभाव फार कमी असतो. मुख्यतः त्यांच्या वर्तनाचाच अधिक प्रभाव पडत असतो, या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना डीएसपी म्युच्युअल फंडाच्या कंझ्युमर ग्रोथ मार्केटिंगचे प्रमुख मनीष राठी म्हणाले. “अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार गुंतवणूक लवकर काढून घेतात, बाजाराच्या गतीचा पाठलाग करण्याचा अनाठायी प्रयत्न करतात किंवा बाजारात अल्पकालावधीत गोंधळाचे वातावरण असताना या वातावरणाला अनुसरून घाईने

निर्णय घेतात. ईएलएसएसचे लॉक-इन वैशिष्ट्य अर्थात मुदतसक्तीचे वैशिष्ट्य गुंतवणूकदारांना बाजाराच्या चढउतारांदरम्यान सतत गुंतवणूकशील राहण्यास प्रोत्साहित करते आणि अशा गोंधळात कोणतेही पाऊल उचलण्याच्या प्रवृत्तीला मज्जाव करु शकतात.”

डीएसपीने संकलित केलेल्या अंतर्गत आकडेवारीच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, डिजिटल स्वरुपातील आणि विशेषतः स्वनिर्णयावर आधारित समभागात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचा स्वतःची गुंतवणूक कायम ठेवण्याचा सरासरी कालावधी (होल्डिंग) केवळ अडीच वर्षे इतकाच आहे. दीर्घकाळात संपत्ती निर्मितीच्या उद्दीष्टासाठी आवश्यक असलेल्या कालावधीपेक्षा हा कालावधी कितीतरी पटीने कमी आहे. अशा स्थितीत ईएलएसएसमध्ये तीन वर्षासाठी गुंतवणूक कायम ठेवण्याची असलेली सक्ती (लॉक-इन) आणि हा फंड विविध क्षेत्रातील समभागांत करत असलेल्या गुंतवणूकीमुळे त्याची रचना आणि ऐतिहासिक लाभ हे फ्लेक्सिकॅप-शैलीतील इक्विटी योजनांप्रमाणेच आहे. परंतु त्याचबरोबर हे फंड गुंतवणूकीला शिस्तचीही जोडही देतात.

“यामुळेच आजच्या गुंतवणूकदारांसाठी ईएलएसएसची उपयुक्तता आजही टिकून आहे,” हे स्पष्ट करत राठी पुढे म्हणाले, “बाजारातील अल्पकालीन चढउतारांना प्रतिसाद देण्याचा नैसर्गिक कल बहुतांश व्यक्तींमध्ये असतो आणि अशाचवेळी  गुंतवणूकदारांना अधिकाधिक काळ गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुंतवणूक उत्पादनाची रचनाच त्यांच्यासाठी यशाची शक्यता वाढवू शकते.”

जानेवारी-मार्च या कालावधीत करबचतीसाठी लक्ष केंद्रित झालेले असते. त्यासाठी बहुतांश वेळा ईएलएसएसचा विचार केला जातो. म्हणझे हंगामी तसेच  एकरकमी गुंतवणूक पर्याय हा पारंपारिक दृष्टीकोन ईएलएसएसबाबत तयार झालेला आहे.

परंतु डीएसपीचा नवा दृष्टिकोन या पारंपारिक दृष्टीकोनाला छेद देतो. डीएसपी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ईएलएसएसकडे नियमित गुंतवणूक योजना (एसआयपी) या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे करबचतीसाठी गुंतवणूक करण्याऐवजी वर्षभर गुंतवणूकीचा पर्याय म्हणूनही हा फंड कार्य करू शकतो.

“दीर्घकालीन गुंतवणूक जेव्हा योग्य रितीने केली जाते आणि ती कायमस्वरुपी केली जाते तेव्हाच ती सर्वोत्तम काम करते,” या मुद्द्याकडे लक्ष वेधत राठी म्हणाले. “ईएलएसएसमध्ये एसआयपी केल्यास गुंतवणूकीला नियोजनाचे स्वरुप येते, तर विशिष्ट मुदतीच्या बंधनामुळे शेअरबाजारातील अस्थिरच्या टप्प्यांमध्ये अचानक बाहेर पडण्याचा धोकाही आपोआप कमी होतो.”

विशेषतः ज्यांना आपल्या गुंतवणूकीत सातत्य राखण्यात अडचण येते अशा गुंतवणूकदारांसाठी केवळ करलाभासाठीचा गुंतवणूक पर्याय नव्हे तर, समभागात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ईएलएसएसला एक व्यावहारिक वर्तणुकीचा उत्तम पर्याय त्यांच्यासमोर आणण्याचा उद्देश डीएसपी म्युच्युअल फंडाने या आपल्या नवीन पुढाकारात ठेवलेला आहे.


Comments are closed.