NGN News
Latest Marathi News

नाशिकमध्ये रायन ग्रुपतर्फे मिनी थॉन उत्साहात; २० शाळांचा सहभाग

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

रायन ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थापक अध्यक्ष डॉ ऑगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे नाशिक शहरात रायन आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळपास नऊ लाख विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

यावर्षीच्या या स्पर्धेत नाशिक मधील 20 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी बारा वर्षाखालील 14 वर्षाखाली व सोळा वर्षाखालील असे तीन गट करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अश्विन राजे मुस्तफा टोपीवाला नितीन शिरभाते गौरी पांडे, योगेश बेरणे अविनाश खैरनार, कल्पेश त्रिवेदी, पोलीस इन्स्पेक्टर कैलास पगारे, दिपाली मोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता प्रभू येशूची प्रार्थना, व पवित्र ग्रंथ बायबल मधील वचन पठणांनी झाली. त्यानंतर मान्यवर ध्वज दर्शवून स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वप्रथम बारा वर्षाखालील विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली. त्या जीविका नागपुरे, आर्या खांडबाहले, इंद्रजीत तेजाळे विद्यार्थ्यांनी प्रथम येऊन पारितोषिक पटकावले. त्यानंतर 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली. त्यात या मनुप पाटील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. त्यानंतर 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली. कृष्णा नागरे या के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. मुलींमध्ये पूर्वी नगरकर प्रथम क्रमांक पटकावला.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये खिलाडू वृत्ती जोपासावी असे मान्यवर अतिथींनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. मान्यवर अतिथींच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस, चषक व पदके देऊन गौरविण्यात आले द्वितीय क्रमांकाचा चषक सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या राणेनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला.

Comments are closed.