मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व बक्षीसे
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
के के वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ सालच्या क. का. वाघ स्मृती चषक अर्थात पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक या १२ व्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी के के वाघ विद्याभवन, भाऊसाहेबनगर येथील मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
निफाड, सिन्नर,चांदवड, दिंडोरी व येवला या तालुक्यांमध्ये १२ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळाडूंनी कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, मल्लखांब, स्वॅश, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल, रस्सीखेच व योगासने इ. स्पर्धांमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ३१,०००/- हजार रुपयांचे पारितोषिक पिंपळगाव येथील छावा इलेव्हन यांनी पटकावले. व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात ओझर येथील एचएएल संघाने प्रथम क्रमांकाचे १२१११/- रुपयांचे तर महिला गटात सिन्नर येथील अस्मिता क्लब यांनी बक्षीस पटकावले.
खो-खो स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक दिंडोरी येथील अश्व फाउंडेशन यांनी तर महिला गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ठाणगाव सिन्नर येथील पुंजाजी भोर यांना मिळाले. तसेच कबड्डी पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावत १५१११/-रुपयांचे बक्षीस सहमित्र ब्राह्मणवाडे यांनी मिळाले. त्याचप्रमाने महिला गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस सरस्वती निफाड हिने प्राप्त केले. त्यासोबतच रस्सीखेच १४ वर्ष, १७ वर्षे व १९ वर्ष मुले व मुली यांना प्रथम क्रमांकाची प्रत्येकी ५००० /-रुपयांचे पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या विश्वस्त मा. शकुंतलाताई वाघ, संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ, यशवर्धन वाघ, विलास वाघ, रमाकांत जाधव, रामनाथ आहेर, तानाजी पूरकर, विश्वास घोलप, श्यामराव मोगल, दौलतराव कडलग, मोहिद्दीन शेख, अनिल ताजणे, डॉ शरद आहेर, वैभव कुशारे, बंडू बैरागी, संतू जाधव, काशिनाथ सूर्यवंशी, डॉ राहुल घायाळ, महेश पठाडे, गोरख जाधव, उषा बोरस्ते, बस्तीराम रानडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार यशवंत ढगे यांनी केले. सूत्रसंचालन संजय धनगर व आभार प्रदर्शन दिपक कुंभार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य दिवाकर शेजवळ, प्राचार्य बाळासाहेब मोंढे, मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर, मुख्यध्यपिका संगीता नाईक, अधीक्षक श्रीकांत ढवळे, प्राचार्य डॉ. वैभव भामरे, प्राचार्य डॉ. एम. के. देवरे, किरण वाघ, सारंग नाईक, सुनिल क्षीरसागर, गोविंद कांदळकर, समीर शेख व सागर डोखळे यांनी परिश्रम केले.
Comments are closed.