NGN News
Latest Marathi News

सोबत न आल्यास तुमच्याविना.. भाजपला मित्रपक्षांचा अप्रत्यक्ष ‘अल्टीमेटम’

  • नाशकात भाजप वगळून ‘युती’चे समीकरण ?
  • दोन्ही पक्षांची भाजपकडे एकत्रित ७५ जागांची मागणी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या केवळ चर्चा झडत ठेवून सहकारी पक्षांना टाळण्याच्या आणि प्रत्यक्षात ऐनवेळी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला दूर ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी युतीची तयारी केली आहे. गुरुवारी एकीकडे भाजपमध्ये पक्ष प्रवेशावरून महाभारत सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठक घेवून युतीची चाचपणी केली. बैठकीत भाजप सोबत न आल्यास दोन्ही पक्षांनी ऐक्याची वज्रमुठ बांधण्याचा निर्धार केला.

माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. राज्यात महायुती सरकार असल्याने महापालिका निवडणूक देखील एकत्रित लढण्यात यावी, यासाठी हे दोन्ही पक्ष आग्रही असताना स्थानिक भाजप नेतृत्व, विशेषतः ज्यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी आहे, ते मंत्री गिरीश महाजन, त्यांना चर्चेसाठी प्रतिसाद देत नसल्याने दोन्ही पक्षांत नाराजीचा सूर आहे. भाजपकडे शिवसेनेने किमान ४५ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ३५ जागांची थेट मागणी केली आहे. भाजप मात्र शंभर प्लसचा नारा देवून अप्रत्यक्षरीत्या दोन्ही पक्षांकडे दुर्लक्ष करीत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्रित आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीत भाजपची भूमिका, दोन्ही पक्षांतील सक्षम उमेदवार, कुठे कोणासोबत लढत होऊ शकते आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी शिवसेनेकडून उपनेते अजय बोरस्ते आणि विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, विलास शिंदे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, नाना महाले आदी उपस्थित होते.

महायुतीची आशा मावळली ?

भाजपची महापलिका एकहाती जिंकण्याची महत्वाकांक्षा, ८२ जागांवर आधीच दाखवण्यात येणार हक्क आणि अव्याहत होणारी मेगाभरती लक्षात घेता हा पक्ष महयुतीत लढण्याची अपेक्षा धूसर झाली आहे. शिवाय महायुतीतील दोन्ही भागीदारांनी ७५ जागांची मागणी केल्याने भाजप त्याला कधीही तयार होणार नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच भाजप स्वबळावर तर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढण्याची शक्यता गडद झाली आहे.

कॉंग्रेस …

सत्तेतील महायुतीत गोंधळ सुरु असताना दुसरीकडे विरोधी उबाठा आणि मनसे एकत्र लढणार हे नक्की झाले आहे.

Comments are closed.