NGN News
Latest Marathi News

 शिन्देसेना एक पाऊल मागे; भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव मान्य ?

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत निर्णय

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापालिकेमध्ये महायुती करायची असेल तर किमान ४५ जागा दिल्याशिवाय ती होणार नाही, अशी हटवादी भूमिका घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने आता एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिवसेने मान्य केल्याची माहिती पुढे येत आहे. यावरून नाशिकमध्ये किमान भाजप-शिवसेना युती दृष्टीपथात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक महापालिकेसंदर्भात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक पार पडली. तीमध्ये उपरोक्त निर्णय शिंदेंच्या शिवसेनेनी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रारंभीच्या चर्चेत शिवसेनेने आधी 45 जागांची मागणी होती. मात्र ती बाब अशक्यप्राय असल्याचे सांगत भाजपने ती मागणी धुडकावून लावली होती. दोन्ही पक्षातील बिनीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होवून उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

दिवे, तडवी, बोराडे शिवसेनेत

दरम्यान, मंगळवारी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राहुल दिवे आणि आशा तडवी यांच्यासह नाशिक रोड येथील माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी बुधवारी शिन्देसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. १९९२ पासून दिवे घराण्याने महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये अशोक दिवे हे महापौर राहिले आहेत. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल दिवे आणि प्रशांत दिवे यांनी या परिसरातून निवडून येत नेतृत्व केले आहे. दरम्यान, राहुल दिवे आणि आशा तडवी यांची शिंदेसेनेच्या वतीने प्रभाग क्र. १६ मध्ये उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे.

Comments are closed.