नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
डीएसपी म्युच्युअल फंडने आज डीएसपी निफ्टी ५०० इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ या दोन नवीन फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणल्या आहेत. अप्रत्यक्ष गुंतवणूक स्वरुपातील म्हणजेच पॅसिव्ह श्रेणीतील या फंड योजना आहेत. आधारभूत निर्देशांकांआधारे वैविध्यपूर्ण, पारदर्शक आणि किफायतशीर पध्दतीने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना सहाय्य करणे, हा या दोन योजनांचा मुख्य उद्देश आहे. या योजनांच्या शुभारंभातून डीएसपी म्युच्युअल फंडाने पॅसिव्ह स्वरुपातील गुंतवणूक योजनांच्या विस्तारावर असलेला आपला कायमस्वरुपी भर अधोरेखित केला आहे. शेअरबाजाराच्या विविध कालखंडातील चढउतारादरम्यान सक्रिय गुंतवणूक धोरणांना पूरक ठरणारे सोपे सुटसुटीत पर्याय गुंतवणूकदारांना या योजनांमुळे मिळणार आहेत.
डीएसपी निफ्टी ५०० इंडेक्स फंड हा मुदतमुक्त श्रेणीतील इंडेक्स फंड असून तो निफ्टी ५०० निर्देशांकाच्या आधारे आपली वाटचाल करणार आहे. या निर्देशांकात भारतातील लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप श्रेणीतील आघाडीच्या ५०० कंपन्यांचा समावेश होतो. एकूण सूचीबध्द बाजार भांडवलाचा* सुमारे ९० टक्के हिस्सा या कंपन्यां एकत्रितरित्या दर्शवतात. त्यामुळे हा निर्देशांक भारतीय शेअरबाजार जगतात अतिशय व्यापक प्रतिनिधीत्व करणारा निर्देशांक आहे.
अतिशय मर्यादीत स्वरुपात प्रतिनिधीत्व करत असलेल्या लार्ज-कॅप विश्वाच्या तुलनेत निफ्टी ५०० हा निर्देशांक गुंतवणूकदारांना अतिशय नियोजनबध्द पध्दतीने व्यापक आणि विस्तृत स्वरुपात गुंतवणूकीची संधी देतो. या निर्देशांकामुळे बाजाराच्या वाटचालीनुरुप लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये स्वयंचलित पध्दतीने गुंतवणूकीचे समायोजन होते. यामुळे पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल करण्याची किंवा धोरणात्मक वाटपाचे निर्णय घेण्याची गरज भासत नाही आणि गुंतवणूकदार अर्थव्यवस्थेच्या त्याचबरोबर शेअर बाजाराच्या विविध चढउतारांच्या प्रवाहातही गुंतवणूकक्षम राहू शकतात.
सक्रियपणे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या फ्लेक्सी-कॅप रणनीतींशी हा निर्देशांक अतिशय कमी प्रमाणात समानता दर्शवत असल्यामुळे गुंतवणूकदारांना समभागांत गुंतवणूकीचा वेगळा पर्याय मिळाला आहे. तसेच हा पर्याय फंड व्यवस्थापकाच्या गुंतवणूक शैलीतील पूर्वग्रह आणि समभाग निवडीच्या जोखमीपासून मुक्त आहे. विशेषतः सातत्यपूर्ण अल्फा स्वरुपातील परतावा निर्माण करणे अधिक कठीण असलेल्या परिस्थितीत दीर्घ कालावधीच्या दृष्टीकोनातून केलेल्या व्यापक गुंतवणूकीमुळे अधिक पारदर्शक स्वरुपात परतावा मिळविण्यात गुंतवणूकदारांना मदत होते.
डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ हा मुदतमुक्त श्रेणीतील एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. निफ्टी १०० मध्ये बाजार भांडवलानुसार ५१ ते १०० या क्रमांकावर असलेल्या कंपन्यांवर आधारित निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांकानुसार वाटचाल करण्यासाठी हा फंड तयार करण्यात आलेला आहे. हा निर्देशांक ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या लार्ज-कॅप कंपन्या आणि उदयोन्मुख म्हणून झपाट्याने पुढे येत असलेल्या कंपन्या या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणून काम करतो. कंपन्यांचा हा गट विविध क्षेत्रात गुंतवणुकीची संधी देतो, त्याचबरोबर दीर्घकालीन वाढीची क्षमताही प्रदान करतो. परंतु या कंपन्यांत अस्थिरताही अधिक असते.
या दोन्ही फंड योजनांचा उद्देश त्रुटींच्या अधीन राहत आपापल्या निर्देशांकांचा बारकाईने मागोवा घेणे, हा आहे. डीएसपीने खास विकसित केलेल्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्कची गुंतवणूकीसाठी मदत मिळणार आहे. हा डेस्क निर्देशांकाच्या वाटचालीनुरुप कामगिरी करणे, गुंतवणूकीत वेळोवेळी पुनर्संतुलन साधणे आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये अवलंब केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम जागतिक पद्धतींचे पालन करतो.
बाजारात वैविध्यपुर्ण गुंतवणूकीच्या माध्यमातून दीर्घकालीन भांडवल वाढ हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी ५०० इंडेक्स फंड (निफ्टी ५०० निर्देशांकानुरुप वाटचाल/त्याचा मागोवा घेणारी मुदत-मुक्त योजना) ही फंड योजना योग्य ठरु शकते. तर दीर्घ गुंतवणुक कालावधीबरोबरच तात्पुरत्या चढ-उतारांना सामोरे जाण्यास तयार असलेले आणि जे आपल्या समभाग गुंतवणुकीला पूरक गुंतवणूक शोधत आहेत, असे गुंतवणूकदार डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ (निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांकानुरुप वाटचाल/त्याचा मागोवा घेणारी मुदत-मुक्त योजना) फंड योजनेचा विचार करु शकतात.
या दोन्ही योजनांची नवीन फंड ऑफर (एनएफओ) १९ डिसेंबर २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आहे आणि ती येत्या ३० डिसेंबर २०२५ रोजी बंद होणार आहे.
नवीन फंडांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रॉडक्ट्सचे प्रमुख आणि सीएफए अनिल घेलानी म्हणाले, “जेव्हा निर्देशांकांची निवड केवळ त्यांच्या अलीकडील काळातील कामगिरीसाठी नव्हे, तर पोर्टफोलिओमध्ये ते बजावत असलेल्या भूमिकेसाठी केली जाते, तेव्हा पॅसिव्ह स्वरुपातील (अप्रत्यक्ष स्वरुपातील) गुंतवणूक सर्वोत्तम ठरते. निफ्टी ५०० हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारांना एक व्यापक, विकसित होत असलेली गुंतवणूकीची संधी प्रदान करतो, तर निफ्टी नेक्स्ट ५० अजूनही संक्रमण आणि वाढीच्या टप्प्यात असलेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. हे दोन्ही फंड दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून तयार करण्यात आलेले आहेत आणि आपली जोखीम क्षमता त्याचबरोबर गुंतवणुकीच्या कालावधीवर आधारलेल्या आपल्या सक्रिय धोरणांशी गुंतवणूकदार या फंडाचा मिलाफ घडवू शकतात.”
Comments are closed.