NGN News
Latest Marathi News

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण

  • कुंभमेळ्याच्या धर्तीवर छात्र कुंभची संकल्पना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या आगामी हीरक महोत्सवी प्रांत अधिवेशनाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण आज अधिवेशनच्या स्वागत समितीचे अध्यक्ष, उद्योजक जयंत भातंबरेकर आणि स्वागत समितीचे सचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिकमध्ये होवू घातलेल्या कुंभमेळ्याचे प्रतिबिंब असलेल्या या अधिवेशनाच्या पोस्टरची थीम ही छात्र कुंभ करण्यात आली आहे. सदर पोस्टरमध्ये अधिवेशन संदर्भात माहिती, संघशताब्दी व नाशिकची मधील विविध धार्मिक पर्यटन स्थळे यांची माहिती विविध छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डोंगरे वसतिगृह मैदान, कुंभ क्षेत्र नाशिक येथे ३ ते ५ जानेवारी रोजी अभाविपचे प्रांत अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला १ हजार विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी होणार आहे. यासाठीच्या तयारीला वेग आला आहे.

पोस्टर अनावरण प्रसंगी स्वागत सहसचिव रूपेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री मेघा शिरगावे, नाशिक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.