- न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तपोवनमध्ये कोणतीही वृक्षतोड करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय हरित लवाद अर्थात ‘एनजीटी’ने दिले आहेत. लवादाने प्रस्तावित वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दिली. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
लवादाच्या आदेशानुसार, महानगरपालिकेला न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही झाड तोडण्यास मनाई करण्यात आली आहे. लवादाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत. यामध्ये, प्रस्तावित वृक्षतोडीची नेमकी गरज काय आहे, यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि वृक्षांची गणना (ट्री सेन्सस) करण्यात आली आहे का, या सर्व बाबींचा एक सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश एका समितीला दिले आहेत. याचिकाकर्त्यांनाही या अहवालाची नोटीस देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत.
Comments are closed.