राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ८२ शाळेतील सुमारे २३४ संघांचा सहभाग
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक तर्फे दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय प्रGyan – २०२५ विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यंदा विज्ञान प्रदर्शनाचे १३ वे वर्ष हाेय. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे हा प्रदर्शनाचा उद्देश आहे.
या वर्षी प्रदर्शनात ८२ शाळांमधील सुमारे २३४ पेक्षा अधिक संघांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यात विद्यार्थ्यांनी विज्ञान व नवनवीन शोधांशी संबंधित विविध प्रयोग (मॉडेल्स) बनवून, देशाच्या व मानवाच्या उत्क्रांतीसाठी अधिक उपयोग कसा करता येईल हे दाखवून दिले.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रादेशिक सहआयुक्त नितीन पवार, व संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांचे हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. के एन नांदूरकर, प्राचार्य प्रा. पी. टी. कडवे, डॉ. शांतम शुक्ला, परीक्षक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सध्याचे युग विज्ञानाचे असून देशाच्या प्रगतींमध्ये विज्ञान व तरुणांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवनवीन कल्पना व विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यामध्ये अशा प्रदर्शनाचे महत्वाचे योगदान आहे. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धा व वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती निर्माण होते असे प्रतिपादन नितीन पवार यांनी केले.
टिकाऊ ऊर्जेचे स्रोत, वाहन वाहतूक व्यवस्थापनासाठी एकत्रित वाहतूक उपाय, कापणीनंतरचे तंत्रज्ञान, कुंभमेळ्यातील घन कचरा व्यवस्थापन, मूळ विज्ञानासाठी प्रदर्शन उपकरणे, तंत्रज्ञान-सक्षम कृषी पद्धती, शारीरिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तींसाठी तंत्रज्ञान उपाय, कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान, ई-कचरा व्यवस्थापन, कुंभमेळ्यादरम्यान गर्दी व्यवस्थापन उपाय, स्वनिर्मित वैज्ञानिक खेळणी, कमीतकमी खर्चातील पाणी शुद्धीकरण पद्धती, दैनंदिन आयुष्य सुलभ करणारे एआय उपाय अशा विविध विषयांवर नाविन्यपूर्ण प्रयोग (मॉडेल्स) सादर केले.प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून डॉ. प्रविण भंडारी आणि सह समन्वयक अतुल वाटपाडे व पुरुषोत्तम चव्हाण यांनी कामकाज केले.
Comments are closed.