- वाहतूक नियोजनाशी खेळणारे पोलिसांच्या रडारवर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वाहतूक नियोजनाला हरताळ फासून बेशिस्तीचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या रिक्षाचालकांवर नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाईची बडगा उगारला आहे. समाजाला मुजोरीद्वारे वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांच्या तोंडून ‘ नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे वदवून घेणाऱ्या पोलिसांनी आता रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत पावणेतीनशे बेशिस्त रिक्षाचालकांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्याची तर सुमारे दीडशे चालक-मालकांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
नाशिक शहरातील बेशिस्त वाहतूक हा नागरिकांच्या चिंतेचा भाग आहे. पावलोपावली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी विशेष मोहोम उघडून कारवाईची वरवंटा फिरवण्यास प्रारंभ केला आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची चौकट भेदणाऱ्या रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी थेट कारवाई करण्याचे पोलिसांनी धोरण अवलंबले आहे.
तक्रारींचे स्वरूप असे…
शहरातील बेशिस्त वाहतूकीबाबत पोलीस आयुक्तांना व्हाटसअप क्रमांकावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी अल्पवयीन आणि विनापरवाना रिक्षा चालवणे, रिक्षा उभी करताना नियमांची चौकट ओलांडणे, गणवेश आणि परवाना यांबाबत उदासीनता, अधिक वेगाने रिक्षा चालवणे, काही वेळा प्रवाशांची अडवणूक करून मुज्जोरी दाखवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून धोकादायक पद्धतीने रिक्षा चालवणे, रात्रीच्या वेळी अधिक डर आकारून प्रवाशांची लुट करणे, वाहतूककोंडी होत असताना समजदारीची भूमिका न घेणे या प्रमुख तक्रारींची दाखल घेवून कारवाई करण्यात येत आहे.
Comments are closed.