NGN News
Latest Marathi News

माजी नगरसेविका संगीता गायकवाड शिवसेना उबाठा पक्षात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन; पती हेमंत गायकवाड यांचाही पक्षप्रवेश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

एकीकडे इतर पक्षांमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असताना नाशिकमध्ये मात्र ऐन दिवाळीत भाजपला धक्का बसला आहे. नाशिक रोड भागातील पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी सोमवारी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. संगीता गायकवाड यांचे पती आणि बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

‘मातोश्री’ वर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी डॉ.लक्ष्मण शेंडगे, किमया बागुल (राजपूत), रोहिणी उखाडे, प्रवीण पाटील,
भाजपा पदाधिकारी अंकुश व्हावल, सिमा ललवाणी, बबीता मोरे, सुजाता गोजरे, सुजाता गवांदें, कांचन चव्हाण, जयकुमार ललवाणी, सत्यम खोले, हर्ष चव्हाणके हेदेखील शिवसेनेत दाखल झाले. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी ‘मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आम्ही मतचोरीसह मतचोर देखील पकडल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच नाशिकमध्ये येवून मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी खासदार संजयजी राऊत, नाशिक सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, माजी आमदार वसंतराव गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपस्थित होते. दरम्यान, गायकवाड दाम्पत्याच्या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये नवी उभारी मिळेल, असे मानले जात आहे.

Comments are closed.