NGN News
Latest Marathi News

घोटी बुद्रुक गटातून ज्ञानेश्वर लहाणे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी

** वाल्मिक गवांदे

इगतपुरी । एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी बुद्रुक हा गट सर्व साधारण गटासाठी राखीव झाला आहे. या गटातून प्रबळ नेतृत्व म्हणून तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले जात आहे. त्यांनी आगामी जिल्हा परिषद घोटी गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून होत आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे चेअरमन असताना त्यांनी उर्जित अवस्था निर्माण केली आहे. तालीम संघाचे नेतृत्व करताना युवकांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले आहे. तालुक्यात व्यायामशाळा मिळवून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

मजूर फेडरेशनमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून घोटी बुद्रुक गटात राजकीय वातावरणात मोठा बदल पहावयास मिळत आहे. कष्टकरी शेतकरी यांची सोडवणूक करण्यासाठी खंबीर नेतृत्व म्हणून ज्ञानेश्वर लहाणे यांच्याकडे आशेने बघितले जात आहे. अनेकांचे आशास्थान असलेले ज्ञानेश्वर लहाणे यांनी घोटी गटात उमेदवारी केल्यास जनतेच्या समस्या सुटण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यापारी, शेतकरी, कामगार आदी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.