- प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होणारे सर्वात तरुण सदस्य
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिकचे इंजी. मनीष कोठारी यांची दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (आयईआय) या संस्थेच्या २०२५–२०२६ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते नाशिकमधून निवडले गेलेले पहिले अध्यक्ष असून या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणारे सर्वात तरुण सदस्य ठरले आहेत.
१९२० मध्ये स्थापन झालेली आयईआय ही जगातील सर्वात मोठ्या बहुविषयक व्यावसायिक अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. शंभराहून अधिक वर्षांच्या परंपरेचा वारसा असलेल्या या संस्थेचे आज जवळपास ९ लाख सभासद आहेत. त्यामध्ये ३ लाखांहून अधिक कॉर्पोरेट सभासद आणि ६ लाखांहून अधिक नॉन- कॉर्पोरेट सभासदांचा समावेश आहे. देशभरात ३२ राज्य केंद्रे, ९२ स्थानिक केंद्रे तसेच ६ विदेशी विभागांमार्फत आयईआय कार्यरत आहे आणि जगभरातील अभियंत्यांना जोडणारे एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे.
नाशिक स्थानिक केंद्राची स्थापना १९८४ साली झाली असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान आणि प्रगतशील केंद्रांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे.
Comments are closed.