NGN News
Latest Marathi News

अतिवृष्टीग्रस्ताना सर्वोतोपरी मदत करणार : माजी खा.समीर भुजबळ

  • येवल्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा केला दौरा; शेतकऱ्यांनी चिंता न करण्याचे आवाहन

येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क

तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली यामध्ये काही भागामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी चिंता करू नये अतिवृष्टीग्रस्ताना आपण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले आहे. आज येवला तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना समीर भुजबळ यांनी भेटी दिल्या यावेळी ते बोलत होते

पुढे ते म्हणाले की, येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते ना. छगन भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार तत्काळ पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. हे काम वेगवान पद्धतीने व्हावे याच्या सूचना देखील आजच्या दौऱ्यात दिल्या आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे आश्वासन खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. येवल्याचे भाग्यविधाते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी देखील या भागाची पाहणी केली आहे. त्यांनी याबाबत सर्व माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देखील मांडली आहे.

पावसामुळे या भागातील रस्त्यांचे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत मात्र ते प्रश्न सोडविण्याचे दृष्टीने देखील आम्ही लवकरच खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम हातात घेऊ. असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले

यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राधाकिसनआप्पा सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, दत्ता निकम, किसनकाका धनके, सचिन कळमकर, मच्छिंद्र थोरात, यांच्यासह येवला येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Comments are closed.