- यंदाची थीम “स्वदेशी खरेदी करा – आत्मनिर्भर भारत घडवा” अशी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स (फेम) तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनाचे ( १४ ऑक्टोबर ) औचित्य साधून या वर्षी भव्य आर्टवर्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीची थीम “स्वदेशी खरेदी करा – आत्मनिर्भर भारत घडवा” अशी जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेत फेमच्या सर्व सदस्य एजन्सींबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी व नवोदित कलाकारांना सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा विषय “स्वदेशी खरेदी / Buy Indian, Build Nation” असा ठरवण्यात आला असून आर्टवर्कचे सादरीकरण 16×15 सेमी आकारात डिजिटल स्वरूपात ( Pdf & cdr / Illustrator फ्री फाईल) पाठवणे आवश्यक आहे.
📩 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. इच्छुकांनी आपली आर्टवर्क्स 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत federation.fame@gmail.com या मेलवर पाठवावीत.
🏆 बक्षिसे :
प्रथम पारितोषिक – ₹11,000 रोख व सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक – ₹5,000 रोख व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक – ₹3,000 रोख व सन्मानपत्र
याशिवाय, प्रथम क्रमांकाचे आर्टवर्क राज्यभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, ही या स्पर्धेची विशेष आकर्षण ठरणार आहे. विजेत्यांची निवड विशेष आर्टिस्ट कमिटीद्वारे केली जाईल व समितीचा निर्णय अंतिम राहील.
फेमचे अध्यक्ष रवी पवार यांनी सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी स्वदेशी खरेदीला चालना मिळणे गरजेचे आहे. युवक व नवोदित कलाकारांनी आपल्या कल्पनाशक्तीतून व सर्जनशीलतेतून या संदेशाला प्रभावीपणे जनमानसात पोहोचवावे, हीच या स्पर्धेमागची प्रेरणा आहे.” फेमचा लोगो मिळवण्याकरता दिलेल्या QR कोड स्कॅन करावा.
Comments are closed.