संस्था आज १२१० बचत गटांपर्यंत विस्तारली : डॉ. अश्विनी बोरस्ते यांची माहिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेची २२ वी सर्वसाधारण सभा गोविंदनगर येथील महात्मा फुले हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेस प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन व नाशिक जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष माननीय डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. विशेष मान्यवर म्हणून अनेक पुरस्कारांच्या मानकरी, समाजसेविका सौ. भिमाबाई जोंधळे उपस्थित होत्या.
व्यासपीठावर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते, उपाध्यक्ष रजिया हुसेन शेख, सचिव अॅड. जयश्रीताई दळवी, कार्यकारी संचालक निर्मलाताई सातभाई संचालक प्रतिभाताई गाडे, , प्रतिभा मस्के ज्योतीताई बोराटे, एडवोकेट अरुणाताई लेंढे, कुमुदिनीताई कुलकर्णी, रजनी वाणी, तसेच बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर अखिलेश बोरस्ते, कायदेशीर सल्लागार अॅड. संजय लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या २२ वर्षांच्या प्रवासाचा आढावा डॉ. बोरस्ते यांनी प्रास्ताविकातून मांडला. अवघ्या ३० बचत गटांपासून सुरू झालेली संस्था आज १२१० बचत गटांपर्यंत विस्तारली असून, लाखो रुपयांपासून सुरू झालेला निधी आज कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.
सभेत विशेषतः ज्या सभासद महिलांचे पती हयात नाहीत आणि ज्यांना कुठलाही आधार नाही, अशा महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘अहिल्या गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या सभासद हर्षली भोसले सुप्रसिद्ध कलाकार यांनी मी अहिल्या बोलते आहे यांच्या जीवनावर एकांकिका सादर केली नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष यांनी संस्थेच्या एकंदरीत वाटचालीचे खूप कौतुक केले आणि महाराष्ट्रात ही एकमेव बचत गटासाठी काम करणारी संस्था असून आजवर 86 पुरस्कारांची मानकरी ठरलेली आहे याचा फेडरेशनच्या चळवळीतला एक भाग म्हणून खूप आनंद वाटतो आहे असे उद्गार काढले तसेच भिमाबाई जोंधळे यांनी महिलांच्या सशक्तिकरणामध्ये फार मोठे योगदान संचालक मंडळ व संस्थेचे अध्यक्ष यांच्या असून स्त्रियांचा सन्मान नवरात्राच्या काळात करताना अशा संस्थांची दखल घेणे व संस्थेमधील महिलांची दखल घेणे पुरस्काराच्या माध्यमातून माणसाला पुढे जाण्यास एक चांगली गती मिळत असते माझ्या छोट्या वाचन चळवळीतून आज एक मोठे हॉटेल उभे राहून पूर्ण महाराष्ट्रभर तिची ख्याती निर्माण झाली यामध्ये तुमच्यासारख्या सगळ्या वाचकांचा फार मोठा वाटा आहे असे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक शितल महाजन, दिपाली मुकणे, शितल बागुल, दर्शन पोळ, बाळकृष्ण जाधव, सोनाली यांचे योगदान लाभले. सभेचे सूत्रसंचालन सीमाताई पेठकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेच्या सन्माननीय संचालिका अनिताताई शिरोडे यांनी केले.
Comments are closed.