NGN News
Latest Marathi News

व्ही-जॉनतर्फे रणबीरसोबत ‘फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो’ जाहिरात मोहीम

व्यक्तिमत्व आणि ओरिजिनॅलिटीचा उत्सव साजरा करणाऱ्या ग्रूमिंगकडे बघण्याचा धाडसी, ताजातवाना करणारा दृष्टिकोन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ग्रूमिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतातील प्रथम क्रमांकाचा शेव्हिंग क्रीम ब्रँड व्ही-जॉनने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रणबीर कपूरसोबत नवीन समग्र जाहिरात मोहिमेची घोषणा केली आहे. “फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो”(“फोटोकॉपी नाही, ओरिजिनल दिसा”) या प्रभावी कल्पनेवर आधारित ही जाहिरात मोहिम ग्रूमिंगकडे नुसती नक्कल करण्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन देत एका अस्सल, प्रामाणिकपणाच्या आणि व्यक्तित्वाच्या दृष्टीने कृती म्हणून बघते.

पिढ्यानुपिढ्या व्ही-जॉन भारतीय घरांमध्ये विश्वास, गुणवत्ता आणि सहज उपलब्धतेसाठी ओळखला जात आहे. या नवीन कॅम्पेनद्वारे ब्रँड आजच्या आत्मविश्वासाने भरलेल्या  आणि आता कुणाच्याही “कॉपी” बनू इच्छित नाहीत तर आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या लूकमध्ये, भावनांमध्ये आणि वागण्यातून ओरिजिनलपणे, स्वतंत्रपणे व्यक्त करू इच्छितात अशा भारतीय पुरुषांच्या आकांक्षा स्वीकारत आहे.

मेगास्टार आणि या कॅम्पेनचा चेहरा असलेला अभिनेता रणबीर कपूर याच संदेशाला त्याचा खास करिष्मा आणि सुसंगती देत आहे. कॅम्पेनबद्दल बोलताना रणबीर म्हणाला: “आजच्या पिढीला नुसतं मिसळून जायला आवडत नाही तर त्यांना सर्वांमध्ये उठूनही दिसायचं असतं. ग्रूमिंग हा तुमची ओरिजिनॅलिटी, तुमचं स्वतःचं मूळ अस्तित्व व्यक्त करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. व्ही-जॉन तरुणांना फोटोकॉपी होणं थांबवून स्वतःला स्वीकारायला सांगतो आहे हे मला खूपच भावलं आहे. आजच्या काळाबद्दल बोलणारी ही साधी पण ताकदवान कल्पना आहे.”

या जाहिरातीची संकल्पना हॅवस क्रिएटीव्हची असून डेंटसु मिडिया सोबत भागीदारीत ही जाहिरात मोहीम टीव्ही, डिजिटल, प्रिंट आणि सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.  विनोद, ताजेपणा आणि तरुणाईची उर्जा दाखवत ही जाहिरात सादर होते. या कथानकात व्ही-जॉन केवळ एक शेव्हिंग ब्रँड नसून पुरुषांना त्यांची खरी ओळख व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करत आत्मविश्वास देणारा सहयोगी म्हणून सादर केला जातो.

व्ही-जॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हर्षित कोचर म्हणाले: “‘फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो’ या मोहिमेद्वारे आम्ही व्यक्तिमत्वाचा उत्सव साजरा करत आहोत. व्ही-जॉन नेहमीच उपलब्धता आणि विश्वासाचे प्रतीक राहिला आहे, पण आजच्या ग्राहकाला प्रासंगिकता आणि ओरिजिनॅलिटीही हवी असते. ही जाहिरात मोहीम म्हणजे  परंपरेशी जोडलेले राहत आपला आवाज अधिक धारदार आणि आधुनिक बनवणाऱ्या द्वैताचे प्रतिबिंब आहे.”

मार्केटिंगचे सरव्यवस्थापक आशुतोष चौधरी  म्हणाले, “ही जाहिरात मोहीम व्ही-जॉन च्या ब्रँड परिवर्तन प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे. हे फक्त ग्रूमिंग प्रॉडक्ट्स दाखवण्याबद्दल नाही तर तुमची ओळख स्वीकारण्याबद्दल आहे. रणबीर हे कथानक पुढे नेत आहे आणि आमचे क्रिएटिव्ह पार्टनर्स ताज्या स्टोरीटेलिंगद्वारे ते जिवंत करत आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांशी आम्ही आणखी घट्ट भावनिक नातं बांधू याची आम्हाला खात्री आहे.”

हॅवस क्रिएटीव्ह इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख क्रिएटिव्ह अधिकारी अनुपमा रामास्वामी म्हणाल्या, “व्ही-जॉन साठीची आमची नवीन जाहिरात मोहीम ही  फक्त आणखी एक उत्पादन जाहिरात नाही. ती मानवी वर्तनातील सर्वव्यापी भावनेला स्पर्श करते आणि लोकांना त्यांच्या निवडीचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडते. प्रवाहाच्या मागे जाणे ट्रेंड्स फॉलो करणे सोपे आहे, पण तुमची स्वतःची वेगळी स्टाईल म्हणजेच शैली तुम्हाला गर्दीतून वेगळे उठून दिसायला मदत करते. ‘डोंट बी अ फोटोकॉपी’ हा क्लटर-ब्रेकिंग दृश्य संदेश रणबीर कपूर आपल्या खास फिल्मी आणि मॅचो स्टाईलमध्ये देतो.”

या जाहिरात मोहिमेतून व्ही-जॉनची नवीन प्रीमियम शेव्हिंग रेंजही ठळकपणे मांडली जाईल. त्यामध्ये सल्फेट फ्री आणि त्वचा शास्त्राच्या दृष्टीने चाचणी केलेल्या प्रमाणित फोर्म्यूलेशन तसेच रेझर्सचा समावेश आहे. या नाविन्यपूर्णतेतून कामगिरी, काळजी आणि ओरिजिनॅलिटीचा यांचा संगम साधणाऱ्या उत्पादनांसह आधुनिक भारतीय पुरुषांच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यामधील ब्रँडची बांधिलकी दिसून येते.  

व्ही-जॉन “फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो” सोबत ग्रूमिंग म्हणजे फक्त साम्य नव्हे, तर आत्मविश्वास; नक्कल नव्हे, तर स्वतंत्र व्यक्तिमत्व असा अर्थ पुन्हा परिभाषित करत आहे. ही जाहिरात मोहीम “ग्रूमिंग इंडिया” च्या सहा दशकांच्या परंपरेशी प्रामाणिक राहत  त्याच वेळी पुढील पिढीबरोबर सुसंगत राहण्याचे ब्रँडचे ध्येयही अधोरेखित करत आहे.

Comments are closed.