जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश
नाशिक/येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
सोमवारी रात्री येवला तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहे.
काल रात्री येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता, देवळाणे, देवठाण, भुलेगाव, भायखेडा, खामगाव, गवंडगाव आंबेगाव ,सोमठाण देश यासह तालुक्यात अतिवृष्टी सदृष्य पाऊस झाला आहे. यामुळे मका, कांदा, भुईमूग, सोयाबीन, बाजरी सह अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व येवल्याचे तहसलीदार आबा महाजन यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.
Comments are closed.