‘निमा; समवेत मार्गदर्शन वर्ग संपन्न; मान्यवरांसह उद्योजकांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, रोजगारक्षमता तसेच सर्व क्षेत्रांत सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत (पीएमव्हीबीआरवाय) योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्याचा लाभ नियोक्ते आणि कामगारांनी घ्यावा, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी केले.
या योजनेची माहिती देण्यासाठी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील निमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनिलकुमार प्रीतम बोलत होते. व्यासपीठावर भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय आयुक्त(2) राजेंद्र राजदेरकर, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, सहाय्यक आयुक्त के.के.कुंभार,उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,अनिल मंत्री, हेमंत राख, श्रीकांत पाटील तसेच शहरातील उद्योजक उपस्थित आदी होते.
या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास एक महिन्याचे वेतन (15,000/- रुपयापर्यंत) मिळेल, तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षांपर्यंत प्रोत्साहन दिले जाईल. तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षांसाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती.
प्रोत्साहनात्मक पेमेंट पंत्रणा या योजनेच्या भाग (अ)अंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व पेमेंट आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (एबीपीएस) वापरून डीबीटी पेट लाभ हस्तांतरण) मोडद्वारे केले जातील. भाग ब अंतर्गत नियोकायांचे पेमेंट थेट त्यांच्या पॅन-संलग्न खात्यांमध्ये केले जाईल,असेही यावेळी सांगण्यात आले.
‘निमा’च्या पुढाकाराने 16, 000 कोटींची गुंतवणुक..
प्रास्ताविकात अध्यक्ष आशिष नहार यांनी ‘निमा’ने आतापर्यंत केलेल्या वाटचालीचा आलेख सादर केला. गेल्या काही दिवसांत निमाच्या पुढाकाराने 16, 000 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून आणखी काही गुंतवणूक आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पीएफ कार्यालयाच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील, असेही नहार पुढे म्हणाले.
Comments are closed.