NGN News
Latest Marathi News

पद्मश्री बाबुभाई राठी स्मृत्यर्थ ‘निमा’त उद्या निर्यात विषयक व्याख्यान

  • लोकल टु ग्लोबल’ या विषयावर मच्छिंद्र घाडगे संबोधणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक उद्यमनगरीचे जनक आणि नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री बाबुभाई राठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त निमा आणि रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.4 सप्टेंबर रोजी निमा सभागृहात सकाळी 10 वाजता लोकल टु ग्लोबल या विषयावर जेएनपीए(मुंबई)चे अधिकृत कस्टम एजंट मच्छिंद्र घाडगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

नाशिकच्या विकासात ज्यांचे मोलाचे योगदान लाभले त्यात पद्मश्री बाबुभाई राठी यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नाशिकच्या उद्यमनगरीची पायाभरणी त्यांनी केली.आज नाशिकची मंत्रभूमी ते तंत्रभूमी अशी जी वाटचाल झाली आहे आणि नाशिकने औद्योगिक क्षेत्रात यशाचे जे एव्हरेस्ट शिखर गाठले आहे त्यात बाबुभाई राठी यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि नवोदित उद्योजकांना त्यांच्यापासून प्रेरणा घेता यावी यासाठी आजचे व्याख्यान सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल,असा विश्वास निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीचे संस्थापक तुषार चौधरी तसेच आयात-निर्यात विषयक उद्योजक स्वप्नील क्षत्रिय उपस्थित राहतील. कार्यक्रमास उद्योजक तसेच सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व व्याख्यानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मी निमाचे अध्यक्ष आशिष नहार,उपाध्यक्ष किशोर राठी,मनिष रावल, सचिव राजेंद्र अहिरे,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील व स्टार्ट अप कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

Comments are closed.