NGN News
Latest Marathi News

भारतातील सर्वात मोठा टेलिव्हिजन सादर करत वॉबल डिस्प्लेचा इतिहास

  • 100% क्यूएलईडी सह हा क्रांतीकारी वॉबल 116.5 इंच टेलिव्हिजन
  • भारतातील मोठ्या स्क्रीन टेलिव्हिजन बाजारपेठेत एक नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी विक्रमी 5184 डिमिंग झोनसह एक अत्याधुनिक मिनीएलईडी डिस्प्ले
  •  मॅक्सिमस सीरीज 116.5 इंच, 86 इंच आणि 98 इंच मध्ये उपलब्ध

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क  

इंडकाल टेक्नॉलॉजीज  ब्रॅन्डचा अंतर्गत तंत्रज्ञान विभाग असलेल्या वॉबल डिस्प्लेजने आज मॅक्सिमस सीरीज 116.5 इंच गुगल टीव्ही 5.0 च्या लाँच ची घोषणा केली आणि भारताच्य आजवरच्या सर्वात मोठ्या ग्राहक टेलिव्हिजनच्या इतिहासात एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. तंत्रज्ञानाचा हा चमत्कार, इतर ब्रॅन्ड्सपेक्षा खरोखरच उच्च दर्जाचा (शब्दश:) आहे आणि वॉबल डिस्प्लेजचे डिस्प्ले तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधन व नवोन्मेष यातील सामर्थ्य प्रदर्शित करतो पूर्णत: आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्सचे वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात, एका भारतीय कंपनीसाठी हा एक अनन्य विक्रम आहे.

मॅक्सिमस सिरीज 116.5 इंच टीव्ही हा, भारतीय गृह मनोरंजनासाठी एक पूर्णपणे नवीन व उत्कृष्ट उदाहरण निर्माण करतो, ज्यामध्ये या प्रचंड मोठ्या आकारात भारतातील पहिलेच क्यूएलईडी प्लस मिनी एलईडी  डिस्प्ले तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे प्रगत क्वांटम डॉट कलर अचूकता आणि उच्च गुणवत्तेच्या 116.5 इंच मिनी-एलईडी बॅकलाइटिंगशी सांगड घालण्यात वॉबल डिस्प्ले पथप्रदर्शक बनतो, तर अशा मोठ्या प्रमाणावर अँड्रॉइड 14 सह नवीनतम गुगल टीव्ही 5.0 ओएस चे पदार्पण करतो. यामुळे अभूतपूर्व स्मार्ट क्षमता आणि अमर्याद सामग्री एकीकृत होतात, ज्या दिवाणखान्यास एका उत्तम मनोरंजन स्थळांमध्ये रूपांतरित करतात. 240 वॅट 6.2.2 ऍरे आणि दोन सुसंगत वूफरद्वारे समर्थित असलेला मॅक्सिमस एक भव्य, थिएटर-श्रेणी एकरूपता-विस्तारित डायनॅमिक्ससह पाहण्याच्या अनुभवाची भव्यता वाढवतो आणि अत्यंत-स्पष्ट तपशील आणि घेरणाऱ्या, त्रिमितीय ध्वनीसह आपल्या घरात सिनेमॅटिक अनुभव पूर्ण करतो.

“आजचा दिवस हा भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक ऐतिहासिक क्षण आहे,” असे इंडकल टेक्नॉलॉजीजचे सीईओ आनंद दुबे म्हणाले. “मॅक्सिमस सिरीज 116.5-इंच हा केवळ भारतातील सर्वात मोठा टीव्ही नाही – तर तो निर्धारित मानकांना आव्हान देण्याच्या आणि भारतीय ग्राहकांसाठी दृश्य आणि ऑडिओ यांच्या मानकात वेगाने सुधारणा करण्याच्या आमच्या उद्दिष्टांचा पुरावा आहे.” आम्ही फक्त एक उत्पादन लाँच करत नाही आहोत, तर आम्ही जगातील सर्वात प्रगत सिनेमाच्या अनुभवांशी यशस्वी प्रतिस्पर्धा करणाऱ्या मनमोहक घरगुती मनोरंजनाच्या एका नवीन युगाची सुरुवात करत आहोत.”

मॅक्सिमस सिरीज म्हणजे अभूतपूर्व क्यूएलईडी प्लस मिनी एलईडी  डिस्प्ले तंत्रज्ञानाचा, अँड्रॉइड 14 द्वारे समर्थित गुगल टीव्ही 5.0 सह मिलाप आहे, ज्यामुळे एक अतुलनीय दृश्य वातावरण निर्माण होते. या डिस्प्लेमध्ये 2000 निट्सचा आश्चर्यकारक शीर्ष ब्राइटनेस आहे – जो भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बहुतेक उत्तम टीव्हींना मागे टाकतो – ज्यामुळे सिनेमॅटिक ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवांसाठी डॉल्बी व्हिजन ऍटमॉसच्या मदतीने अतुलनीय एचडीआर कामगिरी निश्चितच पार पाडली जाते. या टेलिव्हिजनची 4के 144 हर्ट्झ नेटिव्ह रिफ्रेश रेट क्षमता त्याला सर्वोत्तम गेमिंग डिस्प्लेचे स्थान देते, जी पुढील पिढीच्या कन्सोल गेमिंग आणि पीसी कनेक्टिव्हिटीला पूरक ठरते आणि तिच्यात व्यावसायिक गेमर्सना आवश्यक असलेल्या ओघवत्या, विलंब-मुक्त कामगिरीचा समावेश आहे.

Comments are closed.