नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.किशोर पवार, उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी शनिवारी सभेत जाहीर केले.
वाचनालायाकडे आणि नागरिक शिक्षक गौरव समितीकडे आलेल्या विविध प्रस्तावातून निवड समितीने निवड केलेल्या पुरस्कारार्थींची नवे उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सभेपुढे वाचून दाखवली. सर्व निवड करण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांचा गौरव ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून करण्यात येणार आहे.
यांचा होणार गौरव
- प्राथमिक विभाग (मनपा) – योगेश महारु सूर्यवंशी (शाळा क्र. २७, अशोक नगर), अविनाश नामदेव पवार (शाळा क्र. ४६ उपनगर)
- प्राथमिक विभाग (खासगी) – सौ. अनुराधा उत्तमराव बस्ते (सरस्वती विद्यालय), सौ. ज्योती वालझाडे (बालक मंदिर, मराठी माध्यम)
- माध्यमिक विभाग सौ. शामल योगेंद्र पाटील (सरडा कन्या विद्यालय), सौ. कनकलता साकोरीकर (आरपी विद्यालय), विनीत धर्मराज पवार (जनता विद्यालय, सातपूर), सौ. वैशाली विशाल मुळे (विद्याप्रबोधिनी प्रशाला)
मुख्याध्यापक – संजय निवृत्ती डेर्ले (सी एम विद्यालय, मखमलाबाद)
सेवा निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक – सौ. कुंदा जोशी (सिडीओ मेरी हायस्कूल)
सेवा निवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक – अनुराधा माधव नामजोशी (शिशु विहार बालक मंदिर)
महाविद्यालयीन – नागेश्वर राघव भदाणे (प्राचार्य के.टी.एच एम)
व्यावसायिक – द्विवेदी अरुणकुमार ओमकारनाथ, संशोधक सुनीता हनुमंत पाटील
विज्ञान – डॉ. प्रमोद हिरे (एच पी टी महाविद्यालय)
संत साहित्य – डॉ. गजानन वामनराव आंभोरे
विशेष कार्य – श्री. श्रीकांत मोरेश्वर नार्वेकर, डॉ. गंधार मंडलिक,
लोककला – श्रीकांत श्रावण गायकवाड,
शास्त्रीय संगीत – आनंद अत्रे
चित्रकला – श्री. समीर शरदचंद्र कुलकर्णी
क्रीडा – कैलास पांडुरंग लवांड (के.टी.एच एम)\
उच्च माध्यमिक – सौ. छाया अरुण लोखंडे (बी.वाय. के. कॉलेज)
कला माध्यमिक – मनीष जोगळेकर (पेठे हायस्कूल)
महाविद्यालयीन- प्रा. सोमनाथ तुकाराम घुले (के.एस.के., सिडको), प्रा. घनश्याम बाळकृष्ण जाधव
(फार्मसी कॉलेज, गंगापूर रोड), प्रा. संध्या मिलिंद खेडेकर (एस एम आर के कॉलेज)
Comments are closed.