NGN News
Latest Marathi News

प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ. नितीन वाघ काळाच्या पडद्याआड

 नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासक डॉ. नितीन भरत वाघ (४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

डॉ. नितीन वाघ हे आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्याशी चर्चा करण्यासाठी सावंतवाडी येथे गेले होते. मात्र, तेथे हॉटेलमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे हलवण्यात आले. रविवारी अँजिओप्लास्टी करून त्यांना गोव्यातील पणजी येथे आणण्यात आले. मात्र, सोमवारी सायंकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. डॉ. वाघ यांच्या निधनामुळे आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा उमदा अभ्यासक हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

 डॉ. वाघ यांच्या ‘झेन’, ‘निळावंती’ या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या. त्यांनी काही चित्रपट कथाही लिहिल्या. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांचे ‘हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय’ हे पुस्तक सिद्ध झाले होते.

Comments are closed.