NGN News
Latest Marathi News

नाशिकस्थित जितेंद्र ईव्ही-एमईटी्स इन्स्टिट्यूट यांच्यात सामंजस्य करार

  • शैक्षणिक ज्ञानाचे प्रत्यक्ष ईव्ही नवकल्पनांमध्ये रूपांतर करणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकस्थित अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रा. लि. (जेएनईव्हीटीपीएल),जे जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेईकल्स या ब्रँडअंतर्गत कार्यरत आहे, यांनी एमईटी्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग (आयओई), भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या सहकार्याने झालेल्या या भागीदारीचा उद्देश म्हणजे वेगाने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रामधील ज्ञान व कौशल्यांचा परिणामकारक संगम घडवून नवनवीन उपायांची निर्मिती करणे.

हा करार ५ ऑगस्ट २०२५ रोजी एमईटी्स आयओई येथे झालेल्या समारंभात अधिकृतरीत्या स्वाक्षरीत करण्यात आला. संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ.व्ही.पी.वाणी यांनी एमओयू वर स्वाक्षरी केली. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.एस. डी.काळपांडे, प्रा. डॉ. सचिन दहाके आणि अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.जितेंद्र ईव्ही तर्फे संशोधन व विकास (आर अँड डी) विभागातील श्री.तेजस मर्चंट यांनी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यासोबत श्री. सतीश कुलकर्णी व श्री. गणेश जाधव उपस्थित होते.

या भागीदारीत खालील उपक्रम राबवले जाणार आहेत:

·         उत्पादकता वाढविण्यासाठी, तांत्रिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी व प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी आयओई कडून तज्ज्ञ सल्लामसलत

·         इलेक्ट्रिक स्कूटर, रिक्षा, बाईक आणि इतर ई-मोबिलिटी सोल्यूशन्सच्या उत्पादन विकासासाठी तांत्रिक मदत

·         आयओई विद्यार्थ्यांना उद्योग भेटी, इंटर्नशिप्स व लाईव्ह प्रोजेक्ट्सद्वारे प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

डॉ. व्ही. पी. वाणी, प्राचार्य,एमईटी्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग म्हणाले,हा एमओयू  वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगातील नवकल्पना यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.जितेंद्र ईव्ही सोबतच्या सहकार्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जवळून परिचय होईल आणि ते इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील.”


श्री.तेजस मर्चंट,आर अँड डी प्रतिनिधी,जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रा.लि. यांनी सांगितले,”ही भागीदारी केवळ ज्ञानविनिमयापुरती मर्यादित नसून, वास्तव समस्यांचे निराकरण व ईव्ही क्षेत्रातील नवकल्पनांद्वारे सक्षम अभियंते घडविण्यासाठी आहे.या एमओयूच्या माध्यमातून आम्ही संयुक्त संशोधन, उत्पादन विकास आणि प्रतिभाविकासासाठी मजबूत पाया रचत आहोत.”

जितेंद्र ईव्ही विषयी-२०१६ साली सुरू झालेली जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रा. लि. ही नाशिकमधील इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी ४५+ वर्षांचा अनुभव असलेल्या शाह ग्रुपचा महत्त्वाचा भाग आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव असलेल्या जितेंद्र ईव्ही कडे Primo S, JMT Series आणि Yunik असे मॉडेल्स आहेत. ही मॉडेल्स नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक आहेत. गुणवत्ता, पर्यावरणाची काळजी आणि नवीन कल्पना राबविणे हा कंपनीचा नेहमीचा ध्यास आहे. त्यामुळेच जितेंद्र ईव्ही भारतातील हरित वाहतुकीच्या (Green Mobility) चळवळीच्या अग्रेसर आहे.

एमईटी्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग विषयी– भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथे असलेली एमईटी्स आयओई ही अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखली जाणारी नामांकित संस्था आहे. मेकॅनिकल आणि ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये चांगला पाया असलेल्या या संस्थेत उद्योगाशी निगडित अभ्यासक्रम, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थी करिअरमध्ये पुढे जाण्यास तयार होतात.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.jitendraev.com

Comments are closed.