संजय सोनवणे, शीतल ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक उद्योजक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नाशिक मधील नामांकित जे डी सी बिटको कॉलेज ऑफ मॅनेजमेंट द्वारा MBA करत असलेल्या विद्यार्थ्यांना फक्त नोकरी नाही तर नवीन उद्योजक म्हणून सुद्धा असलेल्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकमधील नामांकित उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनवणे तसेच इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनच्या संचालक सौ शीतल ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना संजय सोनवणे यांनी जागतिक स्तरावर भारत हा चौथी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना भविष्यात येऊ घातलेल्या अनेक विविध व्यवसाय संधी, भारतातील अनेक क्षेत्रात होत असलेली भरीव प्रगती, बाहेरील देशातून राज्यात तसेच देशात होणारी परकीय गुंतवणूक आणि येत्या काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा यातील मोठ्या प्रमाणावर होणारी आर्थिक उलाढाल या संदर्भात माहिती दिली,
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी युवकांना आवश्यक असलेल्या शासकीय योजना आणि विशेष सहकार्य या संदर्भात विशेष माहिती दिली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था नवीन उद्योजक घडविण्यासाठी तसेच चालू उद्योगांना विकसित करण्यासाठी करत असलेल्या विविध बाबी संदर्भात विस्तृत माहिती दिली,
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्या साठी जे डी सी बिटको कॉलेज ऑफ मॅन्जमेंट स्टडीज च्या संचालक सौ एस टी औरंगाबादकर आणि उप संचालक सौ स्मिता कचोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित विद्यार्थ्यांसोबत खुली चर्चा करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भविष्यात चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्याने विविध विषयावर मार्गदर्शन शिबिरे विद्यार्थी यांचे साठी घेण्यात येतील, अशी ग्वाही श्री संजय सोनवणे यांनी याप्रसंगी दिली
Comments are closed.