नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपनी – एसबीआय लाईफ इन्शुरन्सने त्यांची नवीन विमा योजना – एसबीआय लाईफ – स्मार्ट शील्ड प्लसची घोषणा केली. हे वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, नॉन- पार्टिसिपेटिंग, शुद्ध जोखीम जीवन विमा उत्पादन आजच्या ग्राहकांच्या बदलत्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले आहे. एसबीआय लाईफ – स्मार्ट शील्ड प्लस एक लवचिक आणि स्केलेबल टर्म इन्शुरन्स प्लॅन ऑफर करते जे जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील व्यक्तीच्या वाढत्या जबाबदाऱ्यांशी सातत्याने जोडलेले आहे.
आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे भविष्यातील नियोजन अधिक सुलभ आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी एसबीआय लाईफ – स्मार्ट शील्ड प्लस हे विचारपूर्वक डिझाइन केलेले आहे. हे तीन पर्याय देते – लेव्हल कव्हर, इन्क्रिझिंग कव्हर आणि लेव्हल कव्हर विथ फ्युचर प्रूफिंग बेनिफिट, ज्यामुळे कोणालाही त्यांच्या आर्थिक तसेच वैयक्तिक गरजांनुसार जीवन कव्हर घेता येते. इन्क्रिझिंग कव्हर बेनिफिट पर्याय वार्षिक 5% दराने विमा रकमेची कमाल मर्यादा 200% पर्यंत आपोआप वाढवतो. लेव्हल विथ फ्युचर प्रूफिंग बेनिफिट पर्याय पॉलिसीधारकांना लग्न, बाळंतपण किंवा घर खरेदीसारख्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांमध्ये कोणत्याही अतिरिक्त वैद्यकीय अंडररायटिंगशिवाय त्यांची विमा रक्कम वाढवण्याची परवानगी देतो. हा पर्याय नॉमिनीला एकरकमी, हप्त्यांमध्ये किंवा दोन्हीचे संयोजन करत लवचिक मृत्यू लाभ पेमेंट पर्याय देखील देतो.
या ऑफरमध्ये पर्यायी वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये बेटर हाफ बेनिफिटचा समावेश आहे, ज्यामुळे हयात असलेल्या जोडीदाराला ₹25 लाखांचे अतिरिक्त जीवन कव्हर किंवा विमा काढताना विमाधारकाने निवडलेल्या विमा रकमेच्या 50% (जे कमी असेल ते) रक्कम मिळेल. यामुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतरही आर्थिक सुरक्षितता कायम राहते. अशा प्रकरणांमध्ये, विमाधारकासाठी लागू असलेला डेथ बेनिफिट भरला जातो, त्यानंतरही अतिरिक्त प्रीमियम भरावे लागत नाहीत आणि जोडीदाराचे संरक्षण सुरू होऊन ते वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत सुरूच राहते.
आयुष्यात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात. त्यांना तोंड देण्यासाठी व्यापक आर्थिक संरक्षण हवे म्हणून यात एसबीआय लाईफ-अपघात लाभ रायडर्सचाही समावेश आहे. जे अपघाती मृत्यू किंवा आंशिक पण कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्यास त्यासाठी आर्थिक मदत करते.
उत्पादनाबद्दल अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा: https://www.sbilife.co.in/en/individual-life-
insurance/protection-plans/smart-shield-plus
या लाँचबद्दल एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आणि मुख्य वितरण अधिकारी श्री. एम. आनंद म्हणाले, “अलीकडे आपल्या देशात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढते आहे. यामुळेच आर्थिक नियोजन आणि आर्थिक संरक्षणाबाबत वाढती जागरूकता आहे. आपल्या जबाबदाऱ्या वाढत्या असताना, विमाधारक अधिकाधिक व्यापक आणि आपल्याला अनुकूल असे विमा उपाय शोधत आहेत. हेच लक्षात घेऊन या बदलत्या गरजांसाठी योग्य असे एसबीआय लाईफ – ‘स्मार्ट शील्ड प्लस’ विचारपूर्वक डिझाइन केले आहे. हे पारंपरिक टर्म इन्शुरन्स उत्पादनाच्या पलीकडे जाऊन महत्त्वाच्या सुधारणा आणि विविध जीवन-टप्प्यावर अनुकूलता प्रदान करते. तसेच दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते. ते पुढे म्हणाले, “आर्थिक संरक्षणाची उत्तम व्यवस्था असेल आणि त्याचे योग्य नियोजन असेल तर एखाद्याची इच्छा, त्यांचे कुटुंब अशा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित
करता येते. हेच ओळखून आम्ही एसबीआय लाइफमध्ये विमाधारकाला आर्थिक काटकटींपासून दूर ठेवणे, यालाच प्राधान्य दिले आहे. या ऑफरसह, आम्ही केवळ संरक्षण प्रदान करत नाही, तर आमच्या ग्राहकांच्या आर्थिक प्रवासात सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो – भविष्यासाठी त्यांना तयार करतानाच त्यांचा आज अधिक सहज सोपा होईल यासाठी प्रयत्न करतो.”
आयुष्यभराच्या पर्यायाअंतर्गत 100 वर्षांपर्यंतचा पर्याय, उच्च विमा रकमेसाठी आणि महिलांसाठी परवडणारे प्रीमियम, अनेक प्रीमियम पेमेंट टर्म्ससह, एसबीआय लाईफ – स्मार्ट शील्ड प्लस हे सर्व वयोगटातील आणि उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी तयार केलेले एक मजबूत, सर्वसमावेशक संरक्षण समाधान आहे.
Comments are closed.