-टॉप ट्रेंडिंग डिशेस, खास पदार्थांची इको-सेव्हर डिलिव्हरीसह सुविधा फक्त ₹99 मध्ये
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील आघाडीचा ऑन-डिमांड कन्व्हिनियन्स प्लॅटफॉर्म स्विगी लिमिटेड (एनएसई: स्विगी / बीएसई: 544285) ने आज सांगितले की कंपनी नाशिकमध्ये सुरू केलेल्या 99 स्टोअर ऑफरवर मोठी पैज लावत आहे. कंपनीने असेही सांगितले की जुलै महिन्यात सुरू केलेल्या या उपक्रमाला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, यात विविध प्रकारचे पदार्थ फक्त ₹99 मध्ये इको-सेव्हर मोडद्वारे मोफत डिलिव्हरीसह उपलब्ध करून दिले जात आहेत. परवडणाऱ्या किमतीकडे लक्ष देणाऱ्या ग्राहकांसाठी आणि जन-झेड वापरकर्त्यांसाठी खास तयार केलेली ही ऑफर, नाशिककरांच्या दैनंदिन जेवणाच्या सवयींमध्ये आधीच बदल घडवत आहे.
मिसळपाव, साबुदाणा खिचडी, भरली वांगी अशा पदार्थांवर प्रेम करणाऱ्या नाशिककरांनी 99 स्टोअरचे उत्साहाने स्वागत केले आहे. परवडणाऱ्या किंमतीत व अस्सल चवीत संतुलन राखण्यासाठी स्विगीने स्थानिक रेस्टॉरंट पार्टनर्ससोबत हातमिळवणी केली आहे. हरी ओम ढाबा, इनायत कॅफे आणि कोकणी दरबार यांसारख्या स्थानिक नामांकित रेस्टॉरंट्सनी स्विगीसोबत भागीदारी केली असून, त्यांनी आपल्या लोकप्रिय पदार्थांना 99 स्टोअरमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे या ऑफरला स्थानिक खाद्यसंस्कृतीशी जोडले गेले आहे.
नाशिकमधून मिळालेला ग्राहकांचा प्रारंभीचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. स्विगी युजर्सना पैशाचे मोल, पदार्थांची विविधता आणि मोफत डिलिव्हरी या बाबी आवडल्या आहेत. अनेकांनी याला लंच ब्रेक्स, कॉलेज मिल्स आणि रात्रीच्या स्नॅक्ससाठी आवडते ठिकाण मानले आहे.
नाशिकमधील 99 स्टोअर ऑफरबद्दल बोलताना, स्विगीचे चीफ बिझनेस ऑफिसर सिद्धार्थ भाकू म्हणाले, “99 स्टोअर ही केवळ एक नवी ऑफर नाही, तर एक वचनबद्धता आहे. चांगले अन्न परवडणाऱ्या किंमतीत आणि सहज उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता – मग तो आमचा तरुण ग्राहक असो किंवा इतर कुणीही. आमच्या वापरकर्त्यांना काय हवे आहे हे आम्ही लक्षपूर्वक ऐकले आहे – मोल, विविधता आणि सोय. ह्याच गरजा लक्षात घेऊन आम्ही 99 स्टोअर सुरू केले आहे, जेणेकरून दैनंदिन जेवणासाठी तुमच्या खिशाला मोठा भार पडू नये. आम्ही रेस्टॉरंट भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत, जेणेकरून नाशिककरांना आता चवदार जेवण आणि चांगली डील यातून निवड करावी लागू नये. ₹99 ही किंमत ठरवणे म्हणजेच संपूर्ण देशभरातील लाखो वापरकर्त्यांसाठी स्विगीला दैनंदिन पसंतीचा पर्याय बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
99 स्टोअर ऑफरबद्दल बोलताना, हरी ओम ढाबाचे मालक कुशाल लुथरा म्हणाले, “आमचे ध्येय नेहमीच अस्सल महाराष्ट्रीयन व उत्तर भारतीय जेवण परवडणाऱ्या दरात देण्याचे राहिले आहे. स्विगीच्या 99 स्टोअरने आम्हाला आमचा शेव भाजी-गहू चपाती कॉम्बो अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे व्यासपीठ दिले, जेणेकरून ग्राहकांना गुणवत्तेशी तडजोड न करता परवडणारे, घरगुती जेवण मिळेल. विद्यार्थी, ऑफिस-गोअर्स व सोलो डाइनर्ससाठी ₹100-₹150 च्या रेंजमधील पोटभर जेवणाला प्रचंड मागणी आहे आणि ही ऑफर त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरली आहे. लोकांना घरगुती, पारंपरिक पण परवडणारे जेवण हवे असते—आमचा कॉम्बो त्या गरजेवर बरोबर बसतो. या व्यतिरिक्त, 99 स्टोअरच्या ऑफरमुळे आमची विक्री आणि दृश्यमानता दोन्ही वाढविण्यास मदत झाली आहे. आठवड्याच्या दिवशीच्या लंच आणि डिनरच्या ऑर्डरमध्ये वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे.”
कोकणी दरबारचे मालक रफी कोकणी यांनी सांगितले, “99 स्टोअर आमच्यासाठी आमच्या मेन्यूमधील परवडणारे आणि दर्जेदार पदार्थ नवीन ग्राहकांना दाखवण्याची उत्तम संधी ठरली. यामुळे आम्हाला बाजारात स्पर्धात्मक राहायलाही मदत झाली, कारण लोकप्रिय पदार्थ आकर्षक किंमतीत दाखवता आले. परवडणाऱ्या जेवणाला विशेषतः लंच आणि डिनरच्या वेळेत मोठी मागणी आहे. अनेक ग्राहकांना ₹100 च्या आत हलके पण समाधानकारक पर्याय हवेत आणि आमचा चिकन क्लिअर सूप कॉम्बो त्यासाठी अगदी योग्य ठरतो. आम्हाला आरोग्य-जागरूक आणि काम करणाऱ्या ग्राहकांकडून सातत्याने मागणी मिळत आहे. 99 स्टोअरमुळे आम्हाला योग्य ग्राहकवर्ग मिळाला, आठवड्याच्या दिवशीच्या ऑर्डर्स वाढल्या आणि आमच्या आउटलेटला नवीन दृश्यमानताही मिळाली.”
इनायत कॅफेचे मालक शादाब फलाह म्हणाले, “आम्ही आमचे बजेट-फ्रेंडली सिग्नेचर डिशेस अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 99 स्टोअरमध्ये सामील झालो. वाढत्या महागाईत ग्राहकांना साधे, चविष्ट व पोटभर जेवण ₹149 च्या आत हवे असते— आणि आमचा एग मसाला-रोटी कॉम्बो त्यांची ही मागणी पूर्ण करतो, जो साधा, प्रोटीनयुक्त व समाधानकारक आहे. स्विगीच्या इको-सेव्हर आणि ₹99+ ऑर्डर्सवर मोफत डिलिव्हरी यांसारख्या फीचर्सनी आमच्या विक्रीत आणि रिपीट ऑर्डर्समध्ये मोठी केली आहे. हा कॉम्बो आमच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक बनला आहे, कारण ग्राहकांना त्याची चव, मोल आणि सोय खूप आवडली आहे. आमच्या मते 99 स्टोअर हा व्हॅल्यू-कॉन्शस ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि मंदावलेल्या वेळेतही आमची दृश्यमानता वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.”
Comments are closed.