पंचवटी : एनजीएन न्यूज नेटवर्क
नागरिकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी आज तुमच्या समोर धडधाकटपणे उभा आहे. माझ्या वडिलांनी अनेक पदे उपभोगली; त्यांनी सर्व पदांना योग्य न्याय दिला. मी त्यांचाच वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजही माझ्या वडिलांबरोबर काम केलेली ज्येष्ठ मंडळी येथे हजर आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधून त्याचे हस्तांतर करत असताना मला विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. राहुल ढिकले यांनी केले.
म्हसरूळ परिसरातील प्रभातनगर येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करताना आ. ढिकले बोलत होते. कार्यक्रमास शहराध्यक्ष सुनील केदार, अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी, अमित घुगे, अॅड. एकनाथ पगार, सतीश जोशी, सुधाकर भोई, एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा अहिल्या वाढणे, नंदिनी पगार, अंजली वाघमारे, राजेंद्र वाघमारे, अनिल विभांडीक, यशवंत अहिरे, शोभा भुसाळ, टिंकू मोराडे, पवन पवार, सचिन पवार, सम्राट मोराडे, निखिल मोराडेउपस्थित होते.
.. तर डिपॉझिट जप्त झालेच नसते
दोन दिवसांपूर्वी माझ्या मित्राला फोन आला. समोरची व्यक्ती त्यास म्हणाली की, तू विधानसभा निवडणुकीत मला मदत केली नाही. आता मनपा निवडणुकीत तुझ्या विरोधात मी एक कोटी रुपये ओतेन; पण तुला पाडेन’ असे सांगत, जर पैशावर निवडणूक झाली असती, तर ‘त्यांचे’ डिपॉझिट जप्त झालेच नसते, असा टोलाही कोणाचे नाव न घेता आ. ढिकले यांनी लगावला !
Comments are closed.