- सरासरी 75 रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी नाराज
लासलगाव : राकेश बोरा
गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयातबंदी हटवूनही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षित दरवाढ झाली नाही. शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ अपेक्षित असताना सोमवारी फक्त 175 रुपयांचीच जास्तीतजास्त आणि सरासरी 75 रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी नाराज आहेत.
बांगलादेशातील व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त कांदा आयात करण्यासाठी परवाने न दिल्यामुळे भारतातून कांदा नाममात्र निर्यात होत असल्यामुळे आशिया खंडात कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्प वाढ झाली आहे मात्र ही कांद्याची वाढ किती दिवस राहते याबाबत शशांकता असल्याचे कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम म्हणाले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी 1126 वाहनातून 16 हजार 592 क्विंटल कांद्याची आवक झाली
या कांद्याला जास्तीतजास्त 1900 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रतीक्विंटला बाजार भाव मिळाला आहे तर गेल्या आठवड्यातील शनिवारी 582 वाहनातून 8 हजार 624 कांद्याची आवक झाली होती जास्तीतजास्त 1725 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 1575 रुपये प्रतीक्विंटला बाजार भाव मिळाला होतो
Comments are closed.