नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या संकल्पनेतून, प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे व नामको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते,या शिबिरात एकूण ३६ रक्तदातांनी रक्तदान केले.
महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे आणि येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी नवजीवन रक्त संचलन या पतपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले. सदर संकल्पना ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंते आनंदराव देशमुख व नरेंद्र सोनवणे उपकार्यकारी अभियंते चरणसिंग इंगळे व भूपेंद्र गांगुर्डे यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणार्थी यांनी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
Comments are closed.