आयमा-निमा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक; वरिष्ठ स्तरावर बैठकीचेही आश्वासन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. वेळप्रसंगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देवळाली मतदारसंघाच्या आ.सरोज अहिरे यांनी ‘आयमा’त झालेल्या उद्योजकांसोबत बैठकीत दिले.
व्यासपीठावर म्हाडाचे नाशिक क्षेत्राचे सभापती रंजन ठाकरे,आयमाचे अध्यक्ष ललित बूब,निमाचे अध्यक्ष आशिष नहार, ज्ञानेश्वर गोपाळे, वरूण तलवार, धनंजय बेळे, राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, योगिता आहेर, मनिष रावल, राजेंद्र अहिरे आदी होते.
ललित बूब व आशिष नहार यांनी औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मुद्देसूद माहिती दिली. अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ते तसेच अंबड औद्योगिक वसाहतीला लिंक असलेला विल्होळी, सारुळ, बेळगाव ढगा रस्ता दुरुस्त करून मिळावा अशी मागणी करून इतर समस्यांबद्दल निवेदनही सादर केले.
उद्योजक रोजगार निर्मिती करीत असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, काही समस्यां सोडवण्यात यश आले आहे.त्यासाठी संबंधित विभागाशी चर्चाही झाल्या आहेत आ. अहिरे त्यांनी सांगितले. यावेळी राहुल गांगुर्डे,जयंत पगार, जयदीप अलिमचंदानी,जगदीश पाटील, कुंदन डरंगे,धीरज वडनेरे, अभिषेक व्यास,विनोद कुंभार,नागेश पिंगळे, रणजीत सानप, सुरज आव्हाड, प्रतीक पगारे,कमलेश उशीर,सोमनाथ बोराडे आदी उपस्थित होते.
कोणत्या प्रमुख मागण्या केल्या ?
बैठकीत गरवारे पॉईंट ते पपय्या नर्सरी उड्डाणपूल व्हावा, औद्योगिक वसाहतीतील वीज नियंत्रणासाठी सबस्टेशन उभारावे व ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवण्यात यावी, औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सोयीसुविधांसाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात यावी, औद्योगिक वसाहतीत सांडपाणी व्यवस्था व भुयारी गटार योजना व्हावी, मोठा उद्योग यावा, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र व्हावे, कुंभमेळ्यासाठी नाशिकरोडला समांतर नवीन रेल्वे स्टेशन उभारावे आदी मागण्या करण्यात आल्या.
Comments are closed.