डॉ.गोगटे परिवाराची ‘सावाना’स रक्षाबंधन निमित्ताने भरीव देणगी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचनप्रेमी नागरिकांपर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्याचे कार्यात साखळी योजना (ग्रंथ पेटी) उपक्रम महत्वाची भूमिका करणार आहे .वाचनालयाने नव्या स्वरुपात सुरु केलेली साखळी योजना ( ग्रंथ पेटी) योजना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ.सौ. जयमंगल गोगटे यांनी केले.
रक्षाबंधन आणि क्रांतिदिनाचे औचित्य साधून नामांकित डॉ.गोपाल उर्फ विलास गोगटे आणि डॉ. सौ. जयमंगल गोगटे यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या साखळी योजनेस कै. गणेश गोगटे यांच्या स्मरणार्थरुपये एक्कावन्न हजाराची देणगी दिली. वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांनी देणगीचे स्वागत केले आणि आभार व्यक्त केले. यावेळी प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी सर्वांचे स्वागत केले. सदर देणगी विवेक गोगटे आणि डॉ.विकास गोगटे यांच्या विशेष प्रयत्नातून मिळाली. सर्व गोगटे परिवाराचा वाचनालयाच्या वतीने शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ.विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष संजय
करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहाय्यक सचिव सोमनाथ मुठाळ, अर्थसचिव गिरीश नातू, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, सदस्य मंगेश मालपाठक उपस्थित होते. उपस्थित देणगीदार आणि प्रमुख अतिथी यांचा परिचय ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी करून दिला तर अर्थ सचिव गिरीश नातू यांनी आभार मानले.
Comments are closed.