NGN News
Latest Marathi News

डीएसपी म्युच्युअल फंडतर्फे भारतातील पहिला फ्लेक्सिकॅप इंडेक्स फंड सादर

  • एसआयपी गुंतवणूकीची शिफारस असलेल्या गुणवत्ता-आधारित फंडाची लवचिकतेच्या दृष्टीकोनातून रचना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

डीएसपी म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सिकॅप क्वालिटी ३० इंडेक्स हा नवीन फंड  बाजारात आणला आहे. हा फंड म्हणजे अल्प खर्चातील पहिले फ्लेक्सिकॅप गुंतवणूक धोरण होय. हे धोरण केवळ दर्जेदार समभाग आणि गतीमान संकेतांच्या (ट्रिगर्स) आधारे अतिशय वेगाने गुंतवणूक यांचा मिलाफ घडवते. भारतात पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या फ्लेक्सिकॅप निर्देशांकाची कामगिरी या फंडाच्या वाटचालीत प्रतिबिंबित होणार आहे. तसेच वेळोवेळी बदलत असलेल्या शेअरबाजारात अतिशय आत्मविश्वासाने वाटचाल करण्यास गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी हा फंड करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.

डीएसपी गुंतवणूकदारांना एसआयपी (SIP) मार्गाने गुंतवणूक करण्याचा सल्ला देते, कारण सध्या (विशेषतः उच्च दर्जाच्या स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्समध्ये) मूल्यांकन जास्त आणि अनिश्चित असू शकतात. एसआयपीमुळे गुंतवणूकदारांना कालांतराने सरासरी खरेदी किंमत मिळविण्यास मदत होते, बाजाराच्या उच्चांकावर खरेदी करण्याचा धोका कमी होतो आणि या फंडाच्या गुंतवणुकीच्या तत्त्वज्ञानाशी—उच्च दर्जाच्या व्यवसायांमध्ये शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणूक— सुसंगत राहते.

समभागातील गुंतवणूकदारांना तोंड द्यावे लागणारी एकसमान आव्हाने हा नवीन फंड सहज पेलतो. उच्च दर्जाचे समभाग ओळखणे, लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्स गटातील समभागांत स्वयंचलित पध्दतीने इष्टतम वाटप कमी खर्चात करणे, ही प्रमुख आव्हाने हा फंड सहज पार करतो.आपल्या कामगिरीत निफ्टी ५०० फ्लेक्सिकॅप क्वालिटी ३० निर्देशांकाच्या वाटचालीचे प्रतिबिंब उमटविणारा हा फंड या निर्देशांकातील ३० सक्षम कंपन्यात गुंतवणूक करणार आहे. त्यात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप गटातील प्रत्येकी १० कंपन्या निवडण्यासाठी विविध गुणवत्ता घटकांचा वापर करतो. तसेच प्रत्येक गटातील समभागाला समान अधिभार प्रदान करतो. उच्च आरओई, कर्जाचा अल्प बोजा आणि कमाईत सक्षम वाढ यासारख्या निकषांआधारे या समभागांची गुणवत्ता निश्चित केली जाते.याचबरोबर सापेक्ष कामगिरीच्या क्षमतेवर आधारित तीन गटांमध्ये निधीचे वाटप करण्यासाठी हा फंड फ्लेक्सिकॅपच्या मोमेंटमचा म्हणजेच गतीरुप वाटचालीचा आधार घेतो. हा फंड नियमांवर आधारलेल्या संकेतांचा निधीवाटपासाठी वापर करतो. या समभागांच्या २०० दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या तुलनेत स्मॉल आणि मिडकॅप्स (SMID) आणि लार्ज कॅप्सचे गुणोत्तर, हा संकेत विचारात घेतला जातो. हा संकेत (सिग्नल) प्रत्येक तिमाहीत निधीचे फेरसंतुलन करण्यासाठी वापरला जातो. त्यात स्मॉल आणि मिडकॅप्स समभागांमधील निधीचे वाटप ३३ टक्के किंवा ६७ टक्क्यांवर (२/३) संतुलित केले जाईल. त्याचप्रमाणे, लार्ज कॅप समभागांतील निधीचे वाटप देखील प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस ३३ टक्के किंवा ६७ टक्क्यांवर फेरसंतुलित केले जाईल.

 ऑक्टोबर २००९ पासून निफ्टी५०० फ्लेक्सिकॅप क्वालिटी ३० इंडेक्सने चक्रवाढ पध्दतीने १८.१ टक्के परतावा दिलेला आहे. हा परतावा निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा सरस असून निफ्टी ५०० टीआरआयने या कालावधीत फक्त १३.० टक्के परतावा दिलेला आहे. गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे फ्लेक्सिकॅप क्वालिटी निर्देशांकाने अस्थिर कालावधीत देखील आपली लवचिकता सिध्द केलेली आहे. पाच वर्षांच्या एसआयपी कालावधीत या निर्देशांकाने २०.३ टक्के सरासरी परतावा दिला आहे, जो त्याच कालावधीत निफ्टी ५०० टीआरआयच्या १५.८ टक्के परताव्याच्या तुलनेत अधिक आहे.ही साधी फंड रचना पहिल्या तत्त्वांवर आधारित आहे आणि गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याचा फायदा होतो. त्यामुळे बाजारातील विविध विभागांवर सतत लक्ष ठेवण्याची किंवा योजनांमध्ये बदल करण्याची गरज राहत नाही. नेमके हेच कार्य बाजारात स्वतंत्र्यपणे कार्यरत गुंतवणूकदारांना स्वत:  करावे लागते आणि त्यासाठी त्यांना खर्चाचा भारही उचलावा लागतो. या फंडाच्या अप्रत्यक्ष गुंतवणूक (पॅसिव्ह) रचनेचा अर्थ असा आहे की, पुनर्संतुलन करताना कर भरावा लागत नाही किंवा एक्झिट लोडसारखे शुल्क लागू होत नाही आणि हा लाभ सामान्यतः डीआयवाय (DIY) किंवा सक्रियपणे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या फ्लेक्सी/मल्टी-कॅप फंड धोरणांमध्ये मिळत नाही.

डीएसपी म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कल्पेन पारेख म्हणाले, “चक्रवाढ साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी दोन अटी महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे वाजवी मूल्यांकन असताना उच्च दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे, या होय. किंमत आणि वेळेनुरुप गुणवत्ता या घटकात तीव्र बदल होतात. या धोरणानुसार समभाग त्याच्या अल्प मूल्य पातळीवर असताना फंडाचा शुभारंभ करण्यावर आम्ही नेहमी ठाम विश्वास ठेवलेला आहे. म्हणूनच, आम्ही पहिला फ्लेक्सिकॅप इंडेक्स फंड सादर करत आहोत आणि तो विविध बाजार मूल्य असलेल्या 30 उच्च दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. “

डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स आणि प्रॉडक्ट्स विभागाचे प्रमुख सीएफए अनिल घेलानी म्हणाले ” डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सिकॅप क्वालिटी ३० इंडेक्स फंड पारदर्शक, नियम-आधारित दृष्टिकोन वापरत गतिमान फ्लेक्सिकॅप वाटप आणि उच्च-गुणवत्तांपूर्ण समभागांची निवड या दोन घटकांचा संगम घडवतो. बाजारातील चढउतारामुळे होणाऱ्या कोलाहलापासून दूर राहणे, गुंतागुंत कमी करणे आणि गुंतवणूकदारांना बाजाराच्या विविध चक्रांमध्ये अर्थपूर्णपणे सहभागी होण्यास मदत करण्यासाठी हा फंड तयार करण्यात आलेला आहे. “

डीएसपी म्युच्युअल फंडचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आणि प्रॉडक्टस् विभागाचे प्रमुख साहिल कपूर म्हणाले, “बहुतेक गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणूकीसाठी अचूक वेळ साधताना तसेच निधीचे वाटप करण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. फ्लेक्सी-मोमेंटमवर आधारे पुनर्संतुलन आणि शिस्तबद्ध गुणवत्ता चाळणी या दोन्ही घटकांच्या स्मार्ट एकत्रीकरणातून गुंतवणूकदारांना भेडसवणाऱ्या या आव्हानांना या फंडाची रणनीती सहज तोंड देते आणि त्यामुळे गुंतवणूकीला वेग आणि लवचिकता ही दोन्ही वैशिष्ट्ये प्रदान होतात.”

या फंडाच्या आधारे डीएसपी कौशल्यपुर्ण, नियम-आधारित, किफायतशीर आणि बाजारातील विविध परिस्थितीत काम करण्यासाठी तयार केलेली धोरणे प्रदान करत गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवत नवोपक्रम राबविण्याच्या बाबतीत आपली वचनबद्धता आणखी दृढ करत आहे.डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सिकॅप क्वालिटी ३० इंडेक्स फंडाची नवीन फंड ऑफर (एनएफओ) ८ ऑगस्ट २०२४ रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली असून येत्या २२ ऑगस्ट २०२५ ला बंद होणार आहे. फंडाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि माहितीपत्रकासाठी गुंतवणूकदारांनी www.dspim.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments are closed.