जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
काहीही झाले तरी प्रफुल्ल लोढाच्या संदर्भातला विषय आपण सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त करीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज प्रफुल लोढाकडे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच जोडे मारायचे तर महाजन आणि लोढा यांच्या प्रतिमांना मारा, असे आव्हान खडसे यांनी आंदोलनकर्त्या भाजप कार्यकत्यांना दिले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी महाजन-लोढा जोडगोळीवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. प्रफुल्ल लोढाकडे कोणत्या व्हिडिओ क्लिप आहेत, कोणाच्या आहेत त्या तपासा, कोणता मंत्री त्यामध्ये सहभागी आहे, असे आव्हानही खडसे यांनी यावेळी दिले. नाशिकमधील बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणामध्ये ७२ अधिकारी आणि चार मंत्री सहभागी असल्याचे बोलले जाते. याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
@ प्रांजल खेवलकर यांना पुण्यामध्ये रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार नसताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या कुणाच्या आधारावर बोलताय? माझे नाव त्या सतत का घेताय? तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळते का की तो दारू पितोय की अजून काही करतोय ते ? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनीट्रॅपवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सध्या सुरू आहेत.
- एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते
Comments are closed.